यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी चढाओढ

By admin | Published: June 11, 2016 02:39 AM2016-06-11T02:39:51+5:302016-06-11T02:39:51+5:30

अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई विभागात २ लाख ६९ हजार १७२ जागा उपलब्ध आहे

This year the bout for the entry of the eleventh | यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी चढाओढ

यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी चढाओढ

Next

प्राची सोनवणे,

नवी मुंबई- अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई विभागात २ लाख ६९ हजार १७२ जागा उपलब्ध आहे. यंदा नव्वदीपार विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असून सीबीएसई बोर्डापेक्षा एसएससी बोर्डाचा निकाल चांगला लागला आहे. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइनबरोबरच आॅफलाइनही प्रवेश घेता येणार
आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला असून मंगळवारपासून आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यंदाचा निकाल हा गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत १.९० टक्क्यांनी कमी आहे. विशेष प्रावीण्यासह प्रथम क्षेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण ८५ हजार १२३ इतकी आहे तर प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ९४ हजार ७३ इतकी आहे. मुंबई विभागाचा निकाल पाहता २ लाख ९७ हजार ७१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यादृष्टीने जागा कमी असल्याचे दिसून येते. उत्तीर्ण विद्यार्थी आणि जागांची संख्या यांचे गणितच जुळत नसून विद्यार्थी संख्येच्या तुलनेत जागांचे प्रमाण यामध्ये २८ हजार ५५७ इतका फरक आहे. जागा अपुऱ्या पडणार असल्याने विद्यार्थ्यांना आवडीचे कॉलेज निवडता येणार की नाही हा प्रश्न पालकांना सतावत आहे. बँक, व्यवस्थापन, सीए, व्यवसाय आदी क्षेत्रांचा विकास व नोकरीच्या संधी पाहता यावर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी वाणिज्य शाखेकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई विभागातील मान्यताप्राप्त महाविद्यालयांची संख्या ११५६ इतकी आहे. ११,४१६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत.
>अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक
आॅनलाइन प्रवेश अर्ज सादर करणे - ७ जून ते १७ जूनपर्यंत
सर्वसाधारण गुणवत्ता यादी घोषित करणे - २० जून सायंकाळी ५वाजता.
आॅनलाइन अर्ज तपासून त्रुटी दुरु स्त अद्ययावत करणे - २१, २२ जून दुपारी ३ वाजेपर्यंत
प्रथम गुणवत्ता यादी घोषित करणे - २७ जून, सायंकाळी ५ वाजता.
प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची फी स्वीकारणे (रु . ५०/- फक्त) -२८, २९, ३० जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
द्वितीय गुणवत्ता यादी
घोषित करणे -४ जुलै सायंकाळी
५ वाजता.
द्वितीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची फी स्वीकारणे (रु . ५०/- फक्त) - ५ व ७, ८ जुलै (सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत)
तृतीय व अंतिम गुणवत्ता यादी घोषित करणे - ११ जुलै , सायंकाळी ५ वाजता.
तृतीय व अंतिम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची फी स्वीकारणे (रु .५०/- फक्त) - १२, १३ जुलै (सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत)
शाखांनुसार जागा
विज्ञान - ८१,४३१
वाणिज्य - १,५३,६७२
कला - ३४,०६४
इनहाऊस जागा
विज्ञान - १०,८५५
वाणिज्य - १,५३,६७२
कला - २०,१८६
अल्पसंख्याक जागा
विज्ञान - २०,१३७
वाणिज्य - ४२,८८४
कला - ७४९७
मॅनेजमेंट
विज्ञान -४०६८
वाणिज्य - ७६७५
कला - १७०५
आॅनलाइन जागा
विज्ञान -४६,३७१
वाणिज्य -८२,९२७
कला - २०,५१०
ंउत्तीर्ण विद्यार्थी व जागांची संख्येत २८ हजार ५५७ इतका फरक आहे.
जागा रिक्त राहतील असा शिक्षण विभागाचा दावा : उपलब्ध जागांची संख्या आणि उत्तीर्ण विद्यार्थी संख्या यांच्यातील तफावत पाहता विद्यार्थ्यांची संख्या ही उपलब्ध जागेपेक्षा जास्त आहे. याबाबत शिक्षण विभागाशी चर्चा केली असला शालेय शिक्षण विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी प्रत्येकाला प्रवेश मिळूनही जागा शिल्लक राहतील असे ठामपणे सांगितले आहे.

Web Title: This year the bout for the entry of the eleventh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.