विमानतळ की एसटी स्टँड?

By मनोज गडनीस | Published: January 28, 2024 12:27 PM2024-01-28T12:27:59+5:302024-01-28T12:28:44+5:30

Airport: नुकत्याच सरलेल्या २०२३ वर्षामध्ये भारतीय हवाई क्षेत्राने १५ कोटी २० लाख प्रवाशांना इप्सित स्थळी सोडत एक नवा उच्चांक गाठला; पण या विक्रमाला अनेक घटनांचे गालबोट लागले. विमान कंपन्या आणि प्रवासी या दोघांच्या पारड्यात चुकांचे हे माप पडल्याचे दिसून येते.

Airport or ST stand? | विमानतळ की एसटी स्टँड?

विमानतळ की एसटी स्टँड?

- मनोज गडनीस 
नुकत्याच सरलेल्या २०२३ वर्षामध्ये भारतीय हवाई क्षेत्राने १५ कोटी २० लाख प्रवाशांना इप्सित स्थळी सोडत एक नवा उच्चांक गाठला; पण या विक्रमाला अनेक घटनांचे गालबोट लागले. विमान कंपन्या आणि प्रवासी या दोघांच्या पारड्यात चुकांचे हे माप पडल्याचे दिसून येते. हे असे का घडले व देशातील विमान प्रवाशांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आगामी काळात काय घडू शकते, याचा वेध घेणारा हा सारांश.

देशात गेल्या दहा वर्षांत ७५ नवी विमानतळे उभारली गेली आहेत. तर अनेक आंतरराष्ट्रीय मार्गांवर देखील भारतीय कंपन्यांचा विस्तार झाला आहे. विमान कंपन्यांनी देखील नव्या विमानांची मोठी खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचसोबत दुसरीकडे हवाई मार्गे जोडणी वाढल्यामुळे वेळेच्या बचतीसाठी अनेक लोक विमान प्रवासाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे विमान प्रवासाचे दर देखील स्पर्धात्मक आहेत. परिणामी लोकांना विमान प्रवास काहीसा परवडत आहे.

 विमान कंपन्या सध्या विस्तार करण्याच्या मागे आहेत. आगामी दहा वर्षांत विमान कंपन्यांच्या ताफ्यात एक हजारापेक्षा जास्त विमाने दाखल होतील. त्याअनुषंगाने विमान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर भरती केली आहे. अनेक विमान कंपन्यांचे कर्मचारी हे नवीन अथवा कमी अनुभवी आहेत.  त्यामुळे जेव्हा एखाद्या विमानाला अनेक तासांचा विलंब होतो किंवा ते रद्द होते, तेव्हा ती परिस्थिती हाताळण्यासाठी वर्गात दिलेले प्रशिक्षण कामी येते असे नाही. 

विमान कंपन्यांचे काय चुकले?
तर तिथे मानवी भावना लक्षात घेत आणि आपण सेवा क्षेत्रात काम करीत असल्याचे नीट उमजून परिस्थिती हाताळावी लागते; मात्र अलीकडे झालेल्या घटनांमध्ये याच दोन गोष्टींचा विसर विमान कर्मचाऱ्यांना पडल्यामुळे तणावाचे आणि क्वचित मारहाणीचे प्रसंग घडल्याचे विश्लेषण हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ राहुल मेहता यांनी केले. 

विमानांद्वारे गेल्या वर्षभरात कोट्यवधी प्रवाशांची वाहतूक झाली आहे. दिवसागणिक प्रवाशांची वाढणारी संख्या आणि विमानांची अपुरी संख्या हे गणित व्यस्त प्रमाणात आहे. परिणामी, विमानांना विलंब आणि प्रवाशांचा उद्रेक होताना दिसत आहे.  

अलीकडच्या काळात पहिल्यांदा आणि नव्याने विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वाहतुकीच्या इतर माध्यमांच्या तुलनेत विमानाच्या प्रवासाचे तिकीट नेहमीच महाग असते. त्यात विमानतळावर गेल्यावर तेथील पंचतारांकित सुविधा पाहून देखील नवखे प्रवासी भारावून जातात. आपल्या पैशांनुसार वागणूक ही त्यांची किमान अपेक्षा असते. 
ग्राहक म्हणून त्यात काही चूक नाही. मात्र, अलीकडच्या काळात विमान वाहतुकीच्या वाढत्या फेऱ्यांमुळे विमानतळावर विमानाच्या पार्किंगची व्यवस्था कमी पडत आहे. त्यामुळे विमानांना जागा होईपर्यंत हवेत घिरट्या घालाव्या लागत आहेत. 
परिणामी, विमानांना विलंब होत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यातच अलीकडच्या काळात हिवाळ्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील काही विमानांना दाट धुक्यामुळे धावपट्टीवर उतरता आले नाही. 

Web Title: Airport or ST stand?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.