वजन नेमकं पाहिजे असेल तर तुम्ही उभे नसताना काटा शून्यावर पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 03:06 PM2017-11-11T15:06:13+5:302017-11-12T07:46:24+5:30

आपल्याला वजन करायचं असतं. ते नेमकं हवं असेल तर काट्यावर उभं राहाण्यापूर्वी आणि काट्यावरून उतरल्यावरही काटा परत शून्यावर आला पाहिजे.

If you want to lose weight, then you should be at the thorn zero when you are not standing | वजन नेमकं पाहिजे असेल तर तुम्ही उभे नसताना काटा शून्यावर पाहिजे

वजन नेमकं पाहिजे असेल तर तुम्ही उभे नसताना काटा शून्यावर पाहिजे

googlenewsNext

- धनंजय जोशी

आपल्याला वजन करायचं असतं.
ते नेमकं हवं असेल तर
काट्यावर उभं राहाण्यापूर्वी आणि
काट्यावरून उतरल्यावरही
काटा परत शून्यावर आला पाहिजे.
आपल्या आयुष्याचंही तसंच आहे.
प्रत्येक क्रिया पूर्ण झाल्यानंतर
काटा परत शून्यावर गेला पाहिजे !
ध्यानसाधनापण तशीच!
प्रत्येक क्षण कसा?
वजनकाट्यावरून उतरलेला !
परत शून्यावर !

क्टरकडे गेलो होतो. दरवर्षी चेकअप करावा असं म्हणतात ना म्हणून!
‘आऽऽऽ’ म्हणून झालं, थोडंसं रक्त काढून झालं, उंची मोजून झाली..
आता अडुसष्टव्या वर्षी उंची वाढली... कशी? तर म्हणे दोन्ही गुडघे नवीन आहेत, त्यामुळे तुमचे पाय सरळ झाले! आणि वजनपण मोजून झालं!
त्या वजनाच्या काट्यावर बघताना माझ्या मनात एक विचार आला.. जर वजन नेमकं पाहिजे असेल तर तुम्ही उभे नसताना काटा शून्यावर पाहिजे. नाही का? नसेल तर वजन चुकीचं मोजलं जाणार!
पण आपल्या आयुष्यामध्ये अशीच गंमत असते. आपण जी जी क्रिया करतो ती शंभर टक्के करत नाही. सान सा निम म्हणायचे, ‘यू मस्ट डू एव्हरीथिंग वन हण्ड्रेड पसर्टण्ट!
म्हणजे काय?
आपण देवासमोर उदबत्ती लावतो. ती संपल्यानंतर जर आपण बघितलं तर काय राहिलं?
- काहीच नाही.
ती उदबत्ती शंभर टक्के जीव देऊन गेलेली असते. उदबत्ती जशी शंभर टक्के जगते, तसंच तो वजनकाटापण!
मग प्रश्न आला कुठे?
कारण आपल्या आयुष्यामधला वजनकाटा परत शून्यावर जात नसतो. आपण एखादी क्रिया करतो ती ‘संपूर्ण’ नसते. म्हणजे आपण त्या वजनकाट्यावरून खाली उतरल्यानंतर काटा शून्यावर परत जातच नाही. मागे रहातो!
आता विचार करा! आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये जर हा काटा परत येत नसेल तर आपल्याला किती आणखी ‘वजन’ जपायला की ओढायला पाहिजे?
मला हसू आलं!
हा वजनकाटापण खूप शिकवून गेला.
आपण जे जे करतो, प्रत्येक दिवशी ते ते कसं करावं?
जसं काही आपण आपलं वजन करतो तसं! उतरल्यानंतर परत शून्यावर!
सान सा निम सांगायचे, आपलं आयुष्य म्हणजे एखाद्या वजनकाट्यावर उभं राहण्यासारखं!
प्रत्येक क्रिया अशी पाहिजे की ती पूर्ण झाल्यानंतर काटा परत शून्यावर गेला पाहिजे!
ध्यानसाधनापण तशीच! प्रत्येक क्षण कसा?
वजनकाट्यावरून उतरलेला!
परत शून्यावर!

Web Title: If you want to lose weight, then you should be at the thorn zero when you are not standing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.