स्टार्ट अप इंडिया

By Admin | Published: November 15, 2015 06:37 PM2015-11-15T18:37:57+5:302015-11-15T19:10:08+5:30

डोक्यात उकळणारे जबरदस्त वेड. आपण काहीतरी करायचे(च) आहे, याची पक्की खूणगाठ - आणि जबरदस्त चिकाटी!

Start up India | स्टार्ट अप इंडिया

स्टार्ट अप इंडिया

googlenewsNext

 रश्मी बन्सल

अनुवाद : ओंकार करंबेळकर
 
डोक्यात उकळणारे जबरदस्त वेड. आपण काहीतरी करायचे(च) आहे, याची पक्की खूणगाठ - आणि जबरदस्त चिकाटी! आणि या तीन गोष्टी एकत्र करून उकळत ठेवलेल्या हंडीखाली पेटलेली असते जबरदस्त आत्मविश्वासाची धगधगती भट्टी! ते खरे इंधन. बाकी असते काय या मुलांकडे? समाजाचा, कुटुंबाचा पाठिंबा?  - तो कसा असेल? कोणतीही वेगळी गोष्ट, नवी चौकटीबाहेरील कल्पना समाज ङिाडकारतोच. हे असे नव्याला नाकारणो नवे नाही.
 
---------------------------
 
उद्योजकतेचा हा किडा कधी चावेल आणि तुम्ही वास्तवात आंत्रप्रनर कधी होऊन जाल हे सांगता येत नाही, असे देशातले वातावरण आहे.
शशांक एनएस आणि अभिनव लाल या दोघांच्या बाबतीत हेच झाले. हे दोघे एनआयटीचे विद्यार्थी. या दोघांनी हा ई-वर्ड (आंत्रप्रनर) कधी ऐकलाही नव्हता. 
त्यांच्या कॉलेजातला एक सिनिअर स्टुडण्ट समर एण्टर्नशिपसाठी स्टॅनफर्डला आला. आल्यावर त्याने सरळ एक आंत्रप्रनरशिप सेलच सुरू केला. उद्योजक घडवण्याची प्रयोगशाळाच!
- भारतात असे प्रयोग तेव्हा नुकते सुरू झाले होते.
शशांक आणि अभिनव यांच्या डोक्यात हे नवे रसायन घुसले, तेव्हा ते कॉलेजच्या तिस:या वर्षाला होते.
स्वत:चा बिङिानेस करायचा, हे त्यांच्या डोक्याने घेतले.
पण म्हणजे काय?
- मग डोके लढवणो, अनेक नवनव्या कल्पनांचा कीस पाडणो सुरू झाले. त्यांना ‘काहीही करून पकेल’ अशी ‘परफेक्ट बिङिानेस आयडिया’ हवी होती.
सुरुवातीचा काही काळ अंधारात हातपाय मारून झाल्यावर डॉक्टरांनी पेशंट्सना दिलेल्या अपॉइण्टमेण्ट्स आणि त्यांचे रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात ठेवणा:या सॉफ्टवेअरची निर्मिती केली. 
दोघांच्या या कल्पनेतून उभ्या राहिलेल्या व्यवसायाला बघता बघता गती येत होती, पण दुसरीकडे कॅम्पस प्लेसमेण्टमध्ये दोघांची निवड होत होती. वर्षाला दहा लाख पगार देणा:या नोक:याही त्यांच्यासाठी चालून येत होत्या. 
- आता काय करायचे? नोकरी? की बिङिानेस?
उत्तर ठरलेलेच होते.
 ‘आम्हाला सुरुवातीच्या काळात खात्री नव्हती, पण नंतर हळूहळू बिङिानेसमधले पोटेन्शिअल लक्षात  आले आणि आम्ही विचार केला, जस्ट फरगेट जॉब, लेट्स डू अवर ओन थिंग!’ - शशांक हसत सांगतो.
दोघांनी नोकरीचा विचार सोडून दिला आणि बिङिानेसमध्ये सारे कष्ट ओतले.
 केवळ एक व्हेकेशन प्रोजेक्ट म्हणून सुरू झालेली शशांक आणि अभिनव यांची प्रॅक्टो डॉट कॉम ही कंपनी आज 25 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करते. 
 एवढेच नाही, तर 25क् तरुणांना या कंपनीत नोक:याही मिळाल्या आहेत. 
केवळ शशांक आणि अभिनवच नाही, तर अशा अनेक सुरस कथा भारतभरात तयार होत आहेत. कॉलेजची हॉस्टेल्स, कॉफी शॉप्स आणि चुटक्या ऑफिसच्या छोटय़ा छोटय़ा क्युबिकल्समधे नव्या नव्या स्वप्नांचे आराखडे आखले जात आहेत.
त्यातून नव्या कंपन्या उभ्या राहू लागल्या आहेत.
हीच ती भारतातली ‘स्टार्ट अप’ क्रांती!
डोळ्यांत भलती स्वप्ने घेऊन रात्री जागवणारे, नवनिर्मितीच्या ऊर्जेने सळसळणारे वेडे तारुण्य स्वत:चा ‘बिङिानेस’ उभा करण्याच्या ध्यासाने पछाडले गेले आहे.
पन्नास वर्षापूर्वी धिरूभाई अंबांनींनी हेच केले होते की - असे कुणीही म्ह्णोल. धिरूभाईंची आठवण येणो स्वाभाविकच. पण आजच्या संदर्भात ते पुरेसे नाही.
का?
प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस करू धजणारा भारतातला पहिला औद्योगिक अपवाद होते धिरूभाई.
खडतर परिश्रम, नशीब, व्यवसायकौशल्य आणि नेमक्या वेळी मिळवलेले/वापरलेले लागेबांधे - कनेक्शन्स  यांच्या जोरावर धिरूभाईंनी सत्तर आणि ऐंशीच्या दशकांमध्ये महत्प्रयासाने उद्योजकांच्या उच्च वर्तुळाचे दार मोडून आत प्रवेश मिळवला होता. टाटा, बिर्ला, आणि मोदी यांच्या रांगेत जाऊन बसणो सोपे कुठे होते?
आज एखाद्या तरुण, होतकरू उद्योजकांसाठी धिरूभाई प्रेरणा असू शकतात फार तर, पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचे स्वप्न तसे परवडणारे नाही आणि बदलत्या काळाच्या संदर्भात तर ते अस्थानीही आहे.
धिरूभाई नाही, पण आजचा तरुण उद्योजक नोकरी डॉट कॉमचे संजीव भिकचंदानी आणि फ्लिपकार्टचे सचिन-बिन्नी बन्सल यांच्याकडे मात्र जरूर पाहू शकतो.
‘त्यांना जमले, तर मग मला का नाही जमणार?’- असा हिय्या करून स्वत:ची वाट शोधू शकतो.
हे नव्या युगातले यशस्वी उद्योजक आहेत. 
सगळे आले मध्यमवर्गातूनच!
कुणाचे वडील शिक्षक होते, तर कुणाचे बॅँक  मॅनेजर; कुणी लष्कराच्या अधिका:यांची मुले आहेत, तर कुणाची आई प्राध्यापकच होती एखाद्या कॉलेजात.
यांच्यामागे ना बडय़ा बापांचा पैसा आहे, ना त्यांच्या खानदानाची हैसियत; ना कुणाचे काका-मामा राजकारणात आहेत, ना कुणाचा कुठे वशिला.
कुणाकुणाची आडनावे बनिया आहेत हे खरे, पण फक्त आडनावेच. त्यांच्या कित्येक पिढय़ांचा ना व्यापाराशी संबंध होता, ना उद्योगाशी!
त्यांच्याकडे होत्या फक्त तीन गोष्टी.
डोक्यात उकळणारे जबरदस्त वेड.
आपण काहीतरी करायचे(च) आहे, याची पक्की खूणगाठ.
- आणि जबरदस्त चिकाटी!
आणि या तीन गोष्टी एकत्र करून उकळत ठेवलेल्या हंडीखाली पेटलेली असते जबरदस्त आत्मविश्वासाची धगधगती भट्टी!
ते खरे इंधन.
बाकी असते काय या मुलांकडे?
समाजाचा, कुटुंबाचा पाठिंबा? - तो कसा असेल?
कोणतीही वेगळी गोष्ट, नवी चौकटीबाहेरील कल्पना समाज ङिाडकारतोच.
हे असे नव्याला नाकारणो नवे नाही.
 हे असेच चालत आलेले आहे. सोळाव्या शतकात ‘पृथ्वी गोल आहे’ हे सत्य चर्चने नाकारलेच होते!
आता एकविसाव्या शतकातले आईबापही काही वेगळे नाहीत.
‘गुड करिअर असे काही ठामठोक नसते’ असे त्यांची मुले म्हणतात, तर ते त्यांनाही पटत नाहीच आहे! 
कोणतेही क्षेत्र घ्या, ते एकाच वेळेस चांगले आणि वाईटही असू शकते. हे फारच व्यक्तिसापेक्ष आहे.  
 एखाद्या मुलाला समजा भाषा विषयामध्ये गती असेल, त्याचे बुद्धिकौशल्य भाषांमध्येच जास्त विकसित होत असेल आणि त्याला आपण हट्टाने आयआयटीमध्ये प्रवेश मिळावा म्हणून अभ्यासाला जुंपले, तर अपयशाशिवाय दुसरे काय हाती लागणार?
 कदाचित असे बुद्धिमान मूल खूप कष्टाच्या जोरावर आणि कोचिंगच्या आधाराने एण्ट्रन्स पास होऊन आयआयटीत प्रवेश मिळवीलही. त्याला/तिला पुढे पदवीही मिळू शकेल. 
पण जे काम करायचे त्यात त्या व्यक्तीचे मनच नसेल, तर अशी व्यक्ती कायम सुमार याच कॅटेगरीत मोजली जाणार आणि मनासारखे काहीच घडत नाही म्हणून कायम वैफल्यात, चिडचिडीत जगणार!
 गुगलच्या सीईओपदी आलेल्या सुंदर पिचाईचेच उदाहरण घ्या.
 तो अभ्यासात अत्यंत हुशार, गणित-विज्ञानाची आवड असलेला मुलगा होता असे त्याचे आईवडील आणि जुने मित्र सांगतात. याच बळाच्या आणि अंगभूत गुणांच्या जोरावर आयआयटी-स्टॅनफर्ड-गुगल असा रस्ता पकडून सुंदर या पदावर पोहोचला.
अर्थात हा फॉम्र्युला सर्वांसाठी सर्वत्र लागू पडेल असे नाही.
मग ज्यांना आपले स्वत:चे स्वप्न साकार करायचे आहे, त्यांनी कुठे जावे?
- त्यांनी अमेरिकेला वगैरे न जाता इथे भारतातच राहावे आणि आपला आपला रस्ता धरावा, असे काहीतरी या देशाच्या मानसिकतेत शिजत घातले आहे, हे नक्की!
आणखी एक.
असली मजा मुकाममे कहा, मजा तो सफरमें है, हे जे काव्याच्या जगात म्हणतात, ते इथे शंभर टक्क्यांहून अधिक खरे.
- त्यामुळे प्रवासातल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा आनंद घेता यायला हवा. पहिले छोटे ऑफिस, पहिली छोटी ऑर्डर. या सेलिब्रेट करण्याच्या गोष्टी.
आणि हो-
‘आय कॅन डू इट’ हा आत्मविश्वास रुजवणारा पहिला क्षणही!
- या वाटेवरून आज भारतातली हजारो तरुण पावले चालत आहेत.
====
 
प्रवासाच्या तीन पाय:या 
आंत्रप्रनरशिप
भलते किचकट स्पेलिंग असलेला हा इंग्रजी शब्द ज्याला नीट उच्चारता येत नाही, त्याच्याही/तिच्याही डोक्याला सध्या चावू लागला आहे. ढोबळ अर्थ सांगायचा झाला, तर आंत्रप्रनरशिप म्हणजे आपले भविष्य आपणच तयार करायचे. 
 हे कसे करावे, विचारायला चमकत्या डोळ्यांची उत्साही तरुण मुले भेटतात, त्यांना मी तीन पाय:या सांगते-
 
1) स्वजाणीव
 यामध्ये स्वत:लाच स्वत:ची ओळख करून घ्यावी लागते. मी कोण आहे, माझी बलस्थाने कोणती आहेत, मी कोठे कमी पडतो/ते, मी कशामुळे आनंदी होतो/ते हे स्वत:लाच ओळखता यावे लागते.
त्यासाठी सकाळी उठल्यावर दहा मिनिटे द्यावी आणि आपल्याशीच शांतपणो विचार करावा.  सुरुवातीच्या काळात हे थोडे कठीण जाते खरे, पण हळूहळू सवय होते. 
वरवरच्या विचारांचे धावते पापुद्रे आधी फार त्रस देतात. मग हळूहळू ते बाजूला सरकू लागतात आणि आतल्या आवाजाची साद ऐकू येऊ लागते. हाच आवाज तुम्हाला योग्य दिशेने, योग्य मार्गावर घेऊन जाणारा असतो. त्याची नीट ओळख पटवून घेऊन त्याच्यामागे जावे मात्र लागते.
 
2) आपला मार्ग ओळखणो 
मी नोकरी चांगली करू शकेन की व्यवसाय हा एकदम पहिला कळीचा प्रश्न आहे. दोन्हीही मार्ग कधीच सोपे नसतात. नोकरीच्या ठिकाणी अनेक घटक तुमच्या नियंत्रणाबाहेरचे असतात. बॉस-सहकर्मचा:यांच्या वागण्यापासून कंपनीच्या पॉलिसीपयर्ंत! काहीच तुमच्या आवाक्यात, नियंत्रणात नसते. आणि तुमच्या स्वत:च्या कंपनीमध्ये तुमच्यासमोर वेगळी आव्हाने असतात. 
नव्या गोष्टी शिकत, नव्या कल्पनांचा स्वीकार करत दोन्ही ठिकाणी तुम्हाला उत्तम कामगिरी पार पाडावी लागते. नव्या गोष्टी शिकाव्या लागतात. आधी कधीही जे केले नाही ते करण्याची हिंमत आणि त्यात यशस्वी होण्याचा आत्मविश्वास कमवावा लागतो.
आणि उत्तम व्यावसायिक होण्याच्या प्रवासात आधी चांगली व्यक्तीही व्हावे लागते.
 
3) स्टार्टिग अप
आता फारशा न रूळलेल्या वाटेवरून जायचे ठरवलेच असेल, तर एका लांबच्या अनिश्चित प्रवासासाठी मनाची तयारी हवी. 
एकदा सुरुवात केली की मात्र मागे वळून पाहणो नाही. 
‘समजा, अपयश हाती आले तर?’
 ‘..पण लोक काय म्हणतील?’
- हे दोन शंकासुर म्हणजे मोठे शत्रू.
अपयशाची क्षिती बाळगू नये आणि लोक काय म्हणतील याची पर्वा करू नये - हा या प्रवासातला पहिला नियम आहे.
मनात धगधगणारी भट्टी पेटती राहील हे पाहणो, जाळ उत्तम राहावा म्हणून सतत चुलीत लाकडे सारत राहणो, कितीही टिपिकल सल्ला वाटला, तरी स्वत:वर विश्वास ठेवण्याला न विसरणो आणि नुसत्या विचारात घोटाळत न बसता योग्य वेळी योग्य कृती करणो हेही महत्त्वाचे!
 
(पण मग आमच्या आईबाबांचे काय? - तरुण उद्योजक आणि त्यांच्या पालकांच्या पिढीचा संघर्ष : रविवार, दि. 22 नोव्हेंबरच्या अंकात)
====
(रश्मी बन्सल : तरुण भारतीय उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा सांगणा:या सात पुस्तकांच्या
मालिकेच्या लोकप्रिय लेखिका. विद्यार्थिदशेतचउद्योजक होणा:या मुलामुलींच्या प्रवासाचा वेध
घेणारे ‘अराइज अवेक’ हे त्यांचे नवे पुस्तक.)
 

Web Title: Start up India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.