‘झेडपी’च्या डिजिटल शाळा, प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 04:38 PM2017-10-14T16:38:12+5:302017-10-15T06:30:09+5:30

‘झेडपी’च्या प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी! नशिबी कायम चणचण, ओसाड पडक्या इमारती आणि सगळ्यांची दूषणे!!

 ZP's digital school, elementary school is ridiculous and neglected! | ‘झेडपी’च्या डिजिटल शाळा, प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी!

‘झेडपी’च्या डिजिटल शाळा, प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी!

Next

- भाऊसाहेब चासकर

‘झेडपी’च्या प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी!
नशिबी कायम चणचण, ओसाड पडक्या इमारती आणि सगळ्यांची दूषणे!!
त्यातून गावखेड्यातली मुले निसर्गाच्या साथीत रमणारी.
त्यांना बंद वर्गखोलीत बसून शिक्षकांची भाषणे ऐकणे नकोसे होते.
मन रमत नाही. मग शाळेत यावेसे वाटत नाही. शेत खुणावते.
डोंगर खुणावतात. झाडे बोलावतात. न कळणारे इंग्रजी घोकण्यापेक्षा
मोकळ्या रानात गुरे वळायला जाणे जास्त मजेचेच असते.
...पण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातल्या खेडोपाडीची, वाडीवस्त्यांवरची मुले
शहरी कॉन्व्हेण्टवाल्यांना टक्कर देत डिजिटल जगाच्या सफरीवर निघाली आहेत. या शाळांच्या भिंती चित्रांनी सजल्या आहेत.
आधीच्या ओसाड अंगणात झाडांची, पक्ष्यांची गजबज आहे.
शाळेत कॉम्प्युटर, एलसीडी प्रोजेक्टर, टॅब्लेट, लॅपटॉप आणि
वेब कॅमेरे आले आहेत.
अनेक शाळांनी स्वत:च्या व्हर्च्युअल लॅब, डिजिटल स्टुडिओ उभारले आहेत. आॅगमेण्टेड रिअ‍ॅलिटी बुक्स वापरून खुर्द - बुद्रुकमधल्या वर्गांत पाठ्यपुस्तके जिवंत होऊ लागली आहेत.
स्मार्टफोन, व्हॉट्सअ‍ॅप, स्काइप अशी साधी साधने वापरून
ही मुले जगाशी जोडली जात आहेत.
... ही जादू कुणी केली?
धडपड्या तंत्रस्नेही तरुण शिक्षकांनी !!!
पदरमोड करून, मदत मागून, गावातून लोकसहभाग मिळवून
या शिक्षकांनी आपापल्या शाळांचा ‘सरकारी’ नक्षाच
बदलून टाकला आहे.

इटस ओके, नॉट टू बी ओके!

- आलिया भट
‘जमतं आपल्याला’ हा एक ट्रॅप आहे.
- हल्ली मी हे लक्षात ठेवते.
आज लोक मला बेस्ट म्हणतात; पण उद्या माझ्यापेक्षा बेटर कुणीतरी येईल.
आपल्यापेक्षा सर्वार्थानं बेटर असं कुणीतरी असतंच या जगात.
त्यानं आपली जागा घेतली की आपण आउट! मग आपण काय करायचं?
आपलं असं एक इन्स्टिंक्ट असतं, ते दाखवील त्या दिशेने जायचं.
जाता-येता अखंड प्लॅनिंग-प्लॅनिंगचा खेळ नाही खेळायचा.
सतत फार विचारबिचार करून निर्णय घेतले की
त्या निर्णयांतली सगळी गंमत
निघून जाते.

शेतात जेव्हा वीज  पिकते 
- समीर मराठे
धुंडी हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातलं तिनेकशे उंबºयांचं छोटंसं खेडं.
गावात कोणाकडेच मोठी शेती नाही. कोणी श्रीमंत नाही. बहुतेकांकडे दोन-तीन एकर शेती.
पण याच गावातल्या काही शेतकºयांनी एकत्र येऊन एक जगावेगळं पीक आपल्या जमिनीच्या तुकड्यांवर लावलं आहे. त्याला बियाणांची, खतांची, कीटकनाशकांची,
मजुरांची कसलीच गरज नाही. पाण्याचीही गरज नाही, पुराचा फटका बसत नाही, रोगराईनं हे पीक मरत नाही. दुष्काळही त्याचं काही वाकडं करू शकत नाही. उलट दुष्काळ उत्तम.
अंग भाजून काढणारं ऊन या पिकाला भलतं मानवतं.
धुंडीच्या शेतकºयांनी लोखंडी खांब रोवून वर टांगलेल्या
या अनोख्या शेतीमध्ये भारतीय शेतकºयांचं नशीब बदलण्याची जादू आहे.
धुंडीतले अल्पशिक्षित शेतकरी असं जगावेगळं काय पिकवतात?
- तर वीज!
सौरऊर्जा.
स्वत:च्या वापरापुरती वीज सौरऊर्जेच्या रूपात तयार करणं आता रुळतं आहे;
पण जास्तीची वीज विकून त्यातून पैसे कमावण्यासाठी सहकारी तत्त्वावर विजेची शेती करणारं धुंडी हे भारतातलं आणि
जगातलंही पहिलं गाव आहे.

अक्षय पात्र

- सायली राजाध्यक्ष
कृष्णाच्या थाळीतलं अन्न कधी संपत नसे म्हणतात.
मी अशाच एका स्वयंपाकघरात पोहचले होते. हुबळी आणि धारवाड या दोन देखण्या गावांच्या मध्ये आशिया खंडातलं हे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक स्वयंपाकघर आहे. इथं रोज सकाळी १२००० ते १५००० किलो गरमागरम भात शिजतो.
तब्बल २५ हजार लिटर सांबार तयार होतं. या सांबारासाठी ८००० ते ९००० किलो भाज्यांचा वापर केला जातो. ज्या दिवशी गव्हाचं पायसम किंवा हुग्गी (एक प्रकारचा शिरा) असतं,
त्या दिवशी इथं शिजलेल्या साजूक तुपातल्या हुग्गीचं वजन असतं ७०००० किलो.
स्वयंपाकाला सुरुवात होते पहाटे साडेतीन वाजता. साडेआठच्या आत सगळे पदार्थ तयार असतात. अवघ्या चार तासांत तयार झालेलं हे अन्न मग इन्सुलेटेड वाहनांमधून हुबळीच्या जवळच्या शाळांच्या दिशेनं धावायला लागतं.
ठरवून दिलेल्या वेळात एकूण ८०७ शाळांपर्यंत पोहचतं.
त्या शाळांमधली १,३६,१११ मुलं रोज दुपारी अंगतपंगत करून जेवतात.

Web Title:  ZP's digital school, elementary school is ridiculous and neglected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.