राज्य पोलीस दलातील २४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:42 AM2018-05-26T01:42:28+5:302018-05-26T01:42:28+5:30

पिंपरी-चिंचवड आयुक्तालय स्थापन करण्याबाबत आदेश काढल्यानंतर या पोलीस निरीक्षकांना बदलीसाठी सोडण्यात येणार आहे.

248 police inspectors transferred to the state police force | राज्य पोलीस दलातील २४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

राज्य पोलीस दलातील २४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Next

मुंबई : राज्य पोलीस दलातील तब्बल २४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी पोलीस मुख्यालयातून काढण्यात आले. तर ६० अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी एका वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये नव्याने सुरू होत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी यातील १४ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालय स्थापन करण्याबाबत आदेश काढल्यानंतर या पोलीस निरीक्षकांना बदलीसाठी सोडण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, भानुदास जाधव, दिलीप भोसले, सुनील दहिफळे आणि प्रदीप लोंढे यांच्यासह कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक यशवंत गवारी आणि सतीश पवार, तर गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, टी. मुजारवर आणि श्रीराम पौळ, रायगड पोलीस दलातील पोलीस निरीक्षक पांडुरंग गोफणे, अहमदनगर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौडचे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली आहे.
तर कार्यकाळ पूर्ण झालेल्या ११५ पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे, ठाणे, नागपूर, नवी मुंबई, जळगावमधील पोलीस निरीक्षकांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील १० अधिकाºयांचा समावेश आहे.
ठाणे, मुंबई, नागपूर, अमरावती आणि पुणे शहरातील एकूण ११९ पोलीस निरीक्षकांना त्यांच्या विनंतीवरून बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. ३१ मेपर्यंत त्यांना नवीन बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आयुक्तालय आणि पोलीस प्रशासकीय विभागातील ६० अधिकाºयांना प्रशासकीय कारणास्तव त्याच ठिकाणी एका वर्षासाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याचे पोलीस मुख्यालयाने जाहीर केले आहे.


राज्यातील ७ अधिकाºयांना आयपीएसचा दर्जा बहाल

राज्य पोलीस दलातील ७ अधिकाºयांना शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) दर्जा बहाल केला आहे. महाराष्ट्र पोलीस सेवेचे (मपोसे) अधिकारी होते.

महाराष्ट्र पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्य दहशतवाद विरोधी विभागात कार्यरत असलेले पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी, मुंबई पोलीस दलातील परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे आणि समाजसेवा शाखेचे उपायुक्त राजेंद्र दाभाडे यांच्यासह विश्वास पांढरे, राजेश बनसोडे आणि विजय मगर या अधिकाºयांचा समावेश आहे. या सात जणांना ४५ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी हैद्राबाद येथे जावे लागणार आहे.

Web Title: 248 police inspectors transferred to the state police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस