मुंबई विमानतळावर वर्षभरात केले ५०९ किलो सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 05:20 AM2019-01-28T05:20:55+5:302019-01-28T05:21:15+5:30

१० कोटींचे अमली पदार्थही हस्तगत

509 kg of gold seized at the Mumbai airport during the year | मुंबई विमानतळावर वर्षभरात केले ५०९ किलो सोने जप्त

मुंबई विमानतळावर वर्षभरात केले ५०९ किलो सोने जप्त

googlenewsNext

- खलील गिरकर 

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) वर्षभरात तब्बल १३९ कोटी रुपये किमतीचे ५०९ किलो सोने जप्त केले आहे. तर, १० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. सीमाशुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. रमा मॅथ्यू यांच्या मार्गदर्शनाखाली एआययू युनिटतर्फे ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या सूत्रांनी दिली.

दुबई व इतर आखाती देशांतून येणाऱ्या विमानांमधील प्रवासी सोन्याची आयात करताना त्याचे सीमाशुल्क भरण्यास टाळाटाळ करतात. यासाठी विविध क्लृप्त्या अवलंबून सोने तस्करी केली जाते. कधी कपड्यांमध्ये, कधी चप्पल, बूट, मोबाइल कव्हर, कधी आणखी कशाचा वापर करून सोने व अमली पदार्थ लपवून आणले जातात. अनेकदा सोने बिस्किटाच्या रूपात आणले जाते. एआययू युनिटला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर अशा प्रवाशांवर पाळत ठेवली जाते व त्यांच्याकडील सोने, चांदी, अमली पदार्थ जप्त केले जातात व त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्यांच्या विरोधात भारतीय सीमाशुल्क कायदा १९६२ अन्वये कारवाई केली जाते.

२७९ आरोपींना अटक
विमानतळावरील एआययू युनिटने वर्षभरात ५०९ किलो ३२ ग्रॅम सोने जप्त केले आहे. त्याची बाजारातील किंमत १३९ कोटी ९५ लाख रुपये आहे. विविध अंमली पदार्थ या विभागातर्फे जप्त केले जातात. गेल्या वर्षभरात १० कोटी ६७ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ विमानतळावर तस्करी करताना ताब्यात घेण्यात आले. या सर्व गुन्ह्यांमध्ये २७९ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात सध्या कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. प्रवाशांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून दूर राहावे, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: 509 kg of gold seized at the Mumbai airport during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.