वसतिगृह भत्त्यासाठी उत्पन्न मर्यादा ८ लाखांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:06 AM2018-06-19T05:06:32+5:302018-06-19T05:06:32+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्त्यासाठीची उत्पन्न मर्यादा ६वरून ८ लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला होता.
मुंबई : डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्त्यासाठीची उत्पन्न मर्यादा ६वरून ८ लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला होता. त्याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला असून २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी लाभार्थ्यांची कमाल संख्या ५०० कायम ठेवण्यात आली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.