जबरदस्त..! IIT मुंबईच्या ८५ विद्यार्थ्यांना मिळाली १ कोटी पॅकेजची जॉब ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 11:07 AM2024-01-05T11:07:39+5:302024-01-05T11:10:15+5:30

जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड, सिंगापूर, हाँगकाँगसारख्या देशात ६३ मुलांची निवड झाली आहे. ८५ जणांना १ कोटींचे पॅकेज मिळाले आहे. 

85 students of IIT Mumbai got a job offer of 1 crore package | जबरदस्त..! IIT मुंबईच्या ८५ विद्यार्थ्यांना मिळाली १ कोटी पॅकेजची जॉब ऑफर

जबरदस्त..! IIT मुंबईच्या ८५ विद्यार्थ्यांना मिळाली १ कोटी पॅकेजची जॉब ऑफर

मुंबई - IIT Campus Placement ( Marathi News ) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) महाविद्यालये देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालये मानली जातात, येथे प्रवेश मिळणे देखील मोठी गोष्ट आहे. आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना जेईई किंवा कॉलेजद्वारे आयोजित पात्रता परीक्षेला बसावे लागते. या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदांवर नोकरी मिळते. अलीकडेच, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (IIT) च्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे १ कोटी रुपयांचे पॅकेज मिळवले आहे, तर ६३ जणांना आंतरराष्ट्रीय ऑफर मिळाल्या आहेत. 

एजन्सीच्या वृत्तानुसार, यंदाच्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी अनेक मोठ्या कंपन्यांनी कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. ही मुलाखत ऑनलाइन माध्यमातून घेण्यात आली, ज्यामध्ये ८५ विद्यार्थ्यांना १ कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये नोकरी मिळाली आहे आणि ६३ विद्यार्थी ज्यांना आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटबाबत या हंगामात कॅम्पसला भेट देणारे टॉप रिक्रूटर्स म्हणजे Accenture, Airbus, Air India, Apple, Arthur D. Little, Bajaj, Barclays, Cohesity, Da Vinci, DHL, Fullerton, Future First, GE-ITC Global Energy and Environment आणि Google सारख्या कंपन्या आहेत असं कॉलेजने सांगितले. 

याशिवाय कंपन्यांमध्ये होंडा आरएंडडी, आयसीआयसीआय-लोम्बार्ड, आयडियाफोर्ज, आयएमसी ट्रेडिंग, इंटेल, जॅग्वार लँड रोवर, जेपी मॉर्गन चेस, जेएसडब्ल्यू, कोटक सिक्योरिटीज, मार्श मॅक्लेनन, महिंद्रा ग्रुप, माइक्रोन, माइक्रोसॉफ्ट, मॉर्गन स्टेनली, मर्सिडीज-बेंज, एलएंडटी, एनके, ओला क्वालकॉम, रिलायन्स ग्रुप, सॅमसंग, शलम्बरगर, स्ट्रँड लाइफ साइंसेज, टाटा ग्रुप, टेक्सास इंस्ट्रूमेंट्स, टीवीएस ग्रुप आणि वेल्स फ़ार्गो येथे मुलाखतीसाठी आले होते.

या संस्थेद्वारे, इंजिनिअरींग आणि औद्योगिकसोबत आयटी, वित्त, बँकिंग, डेटा सायन्स, एनालिटिक्स, रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंटसारख्या कंपन्यांमध्येही विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली. जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड, सिंगापूर, हाँगकाँगसारख्या देशात ६३ मुलांची निवड झाली आहे. ८५ जणांना १ कोटींचे पॅकेज मिळाले आहे. 

Web Title: 85 students of IIT Mumbai got a job offer of 1 crore package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.