Andheri Bridge Collapse: काय आहेत प्रवासाचे पर्यायी मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 09:27 AM2018-07-03T09:27:32+5:302018-07-03T11:17:02+5:30

रात्रभर मुसळधार कोसळणा-या पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे.

Andheri Bridge Collapse: What are the alternate routes of travel | Andheri Bridge Collapse: काय आहेत प्रवासाचे पर्यायी मार्ग

Andheri Bridge Collapse: काय आहेत प्रवासाचे पर्यायी मार्ग

Next

मुंबई- रात्रभर मुसळधार कोसळणा-या पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अंधेरी -विलेपार्ले दरम्यान पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या पुलामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली.

अंधेरी स्थानकाच्या दक्षिण दिशेला हा पूल पूर्व पश्चिम दिशेला जोडणारा आहे. पुलाचा भाग कोसळल्यामुळे ओव्हर हेड वायरमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यासाठी सुमारे 5 ते 6 तास लागणार आहे. ऐन कार्यालयीन वेळेत ही घटना घडल्यामुळे पश्चिम रेल्वेवरून कामावर जाणा-या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
या पुलामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक ही थांबवण्यात आली. दादर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेसला देखील फटका बसला आहे.  बहुतांशी मेल एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.पश्चिम रेल्वे लाईनला पादचारी पूल कोसळल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टच्या वतीने खालील बस मार्गावर जादा बसगाड्या चालविण्यात येत आहेत .
१) बसमार्ग क्र. २०२ -०२ 
२) बसमार्ग क्र.२२५ -०२
३) बसमार्ग क्रं . ३४८ -०१
४) बसमार्ग क्र -४४० - ०४
५) बसमार्ग क्र .४ मर्या -११
६) बसमार्ग क्रं २०२ - ०२ 
७) बसमार्ग क्र २०३ - ०५
 
काय आहेत पर्यायी मार्ग

  • अंधेरी-विलेपार्ले अंधेरी पश्चिम रेल्वेच्या पूर्व आणि पश्चिम डेपोतून विशेष बसेस सोडण्यात आल्या आहेत. 
  • वसई-विरारला राहणारे प्रवासी बसनं ठाणे-घोडबंदर मार्गे मध्य रेल्वेनंही मुंबईत कामावर पोहोचू शकतात. 
  • पश्चिम रेल्वेवरच्या अंधेरी आणि वांद्रे येथील प्रवाशांना मध्य रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. 
  • पश्चिम रेल्वेचे प्रवासी आज मध्य रेल्वेवरून मोफत प्रवास करू शकतात.
  • पश्चिम रेल्वेचे प्रवासी मेट्रोनं घाटकोपरवरून मध्य रेल्वेमार्गे मुंबईत कार्यालयात पोहोचू शकतात.  
  • वांद्रे ते चर्चगेटपर्यंतची पश्चिम रेल्वेवरची वाहतूक सुरू ठेवल्यानं प्रवाशांना त्या मार्गेही प्रवास करता येऊ शकतो. 
  • पश्चिम द्रुतगती मार्गानंही प्रवास करून प्रवासी मुंबईत पोहोचू शकता
  • अंधेरी पूर्व ते पश्चिम प्रवास करणा-या प्रवाशांनी बिस्लेरी जंक्शन-तेली गल्ली-सुर्वे चौक- अंधेरी सबवे- एस. व्ही. रोड या मार्गानं जावे
  • अंधेरी पश्चिम ते पूर्व प्रवास करणा-या प्रवाशांनी जेव्हीपीडी-सुजय हॉस्पिटल जंक्शन- मिठीबाई कॉलेज-एसव्ही रोड-कॅ. मृणालताई गोरे उड्डाणपूल-पार्ले पूर्व-आधार जंक्शन ते पश्चिम द्रुतगती महामार्गाचा वापर करावा
  • एसव्ही रोड ते वेस्टर्न हायवे किंवा वेस्टर्न हायवे ते एसव्ही रोड जाणा-यांसाठी सूचनाः मृणालताई गोरे उड्डाणपूल, खिरानगर जंक्शन-मीलन उड्डाणपूल/ खार सब वे या मार्गाचा वापर करावा

Web Title: Andheri Bridge Collapse: What are the alternate routes of travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.