भीमा-कोरेगाव : 'त्या चिठ्ठीत सापडला दिग्विजय सिंहांचा मोबाईल नंबर'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 01:13 PM2018-09-05T13:13:44+5:302018-09-05T13:14:46+5:30

भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी काँग्रेसचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे म्हटले. तसेच काँग्रेस नेहमीच नक्षलवाद्यांचे समर्थन का करते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Bhima-Koregaon: 'Digvijay Singh's mobile number found in that letter | भीमा-कोरेगाव : 'त्या चिठ्ठीत सापडला दिग्विजय सिंहांचा मोबाईल नंबर'

भीमा-कोरेगाव : 'त्या चिठ्ठीत सापडला दिग्विजय सिंहांचा मोबाईल नंबर'

Next

मुंबई - भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा मोबाईल नंबर आरोप भाजप प्रवक्ते सांबित पात्रा यांनी केला आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणी अटकेतील आरोपींकडे एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीवरुन भाजपने काँग्रेसला टार्गेट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नक्षलांशी संबंध असल्याच्या कारणावरुन पोलिसांनी अनेकांची धरपकड सुरू केली आहे.

भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी काँग्रेसचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे म्हटले. तसेच काँग्रेस नेहमीच नक्षलवाद्यांचे समर्थन का करते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दोन कॉम्रेड नेत्यांमध्ये एका चिठ्ठीची देवाण घेवाण झाली होती. त्या चिठ्ठीवर एक मोबाईल नंबर लिहिण्यात आला आहे. तो मोबाईल नंबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा असल्याची माहिती समोर आली आहे. या आंदोनलासाठी फंड किंवा पैशाची गरज भासल्यास संपर्क करा, असा संदेश या मोबाईल नंबरसह लिहिण्यात आला आहे. दिग्वजिय सिंह यांनी पहिल्यांदाच असे केले नाही. तर, यापूर्वीही झाकीर नाईकसाठी शांतीदूत बनायला ते तयार झाले होते. त्यामुळे नक्षलवादी कारवायांना नेहमीच दिग्विजय सिंह समर्थन देत असल्याचा आरोपही सांबित पात्रा यांनी केला आहे. 

दरम्यान, काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपचा हा आरोप म्हणजे देशातील आणीबाणीची स्थिती असल्याचे काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी म्हटले. तसेच तपास यंत्रणांकडे असलेली चिठ्ठी न्यायालयात जाण्याऐवजी भाजपकडे कशी पोहोचली ? असा प्रश्नही तिवारी यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Bhima-Koregaon: 'Digvijay Singh's mobile number found in that letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.