करी रोडवरील ब्रिटिशकालीन पूल किंचित कलला; मध्यरेल्वे विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 12:01 PM2019-03-09T12:01:08+5:302019-03-09T12:13:57+5:30

मस्जिद बंदर ते करीरोड स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

British bridge on Curry Road slightly tilt; central railway disturbed | करी रोडवरील ब्रिटिशकालीन पूल किंचित कलला; मध्यरेल्वे विस्कळीत

करी रोडवरील ब्रिटिशकालीन पूल किंचित कलला; मध्यरेल्वे विस्कळीत

Next

मुंबई : करी रोडवरील ब्रिटिशकालीन पूल एका बाजुला किंचित कलल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटीकडे जाणारी लोकल वाहतूक स्लो ट्रॅकवर वळविण्यात आली आहे. पूलामुळे ओव्हहेड वायर खाली आली आहे. यामुळे तेथून लोकल जाऊ शकत नाही.


मस्जिद बंदर ते करीरोड स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार करी रोड स्थानकावरील ब्रिटिशकालीन जुना पूल एका बाजुला काहीसा कलला आहे. यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आली आहे. 



 

मस्जिद बंदर ते करीरोड स्थानकादरम्यान एक्स्प्रेस आणि जलद मार्गावरील लोकल थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. 

Web Title: British bridge on Curry Road slightly tilt; central railway disturbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.