Maratha Reservation : विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, सभागृहात घुमला शिव छत्रपतींचा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 01:46 PM2018-11-29T13:46:13+5:302018-11-29T16:53:55+5:30

अजित पवार यांनीही या विधेयकास एकमताने मंजूरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटले आहे.

'Chhatrapati Shivaji Maharaj's Jay' announcement, Maratha Reservation Bill unanimously approved in the Legislative Assembly | Maratha Reservation : विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, सभागृहात घुमला शिव छत्रपतींचा जयघोष

Maratha Reservation : विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, सभागृहात घुमला शिव छत्रपतींचा जयघोष

googlenewsNext

मुंबई - बहुचर्चित मराठाआरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही सभागृहात एकमताने मराठाआरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर, सभागृहात सर्वपक्षीय आमदारांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आज पूर्णत्वास गेली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभा पटलावर मांडले. मराठा समाज आरक्षण विधेयक 2018 या विधेयकास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसकडून एकमताने मंजूरी दिली आहे. त्यानंतर, अजित पवार यांनीही या विधेयकास एकमताने मंजूरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटले आहे. या विधेयकात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. तर, मराठा समाजाचा SEBC प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण विधेयक 2018 सभागृहात मांडल्यानंतर भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा घेतल्या. तर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी सभागृहातील एक आमदार असलेल्या पक्षापासून ते अपक्ष आमदारांपर्यंत सर्वांचेच आभार मानले. तसेच या विधेयकास एकमताने मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक संमत करण्याची विनंती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही हे विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली. त्यानंतर पुन्हा सभागृहाबाहेर सर्वांनीच जल्लोष सुरु केला.



 



 



 

 

 

Web Title: 'Chhatrapati Shivaji Maharaj's Jay' announcement, Maratha Reservation Bill unanimously approved in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.