कोस्टल रोडमुळे मुंबईकर घेणार मोकळा श्वास, ७८ टक्के जागा खुली होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 03:29 AM2018-09-28T03:29:28+5:302018-09-28T03:29:42+5:30

देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणाऱ्या कोस्टल रोडमुळे केवळ प्रवास सुसाट न होता, मुंबईकरांना ‘मोकळा श्वास’ही घेता येणार आहे. कोस्टल रोडसाठी ९० टक्के भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे.

 The coastal road will open the mouthpiece of Mumbai, 78 percent of the seats will be open | कोस्टल रोडमुळे मुंबईकर घेणार मोकळा श्वास, ७८ टक्के जागा खुली होणार

कोस्टल रोडमुळे मुंबईकर घेणार मोकळा श्वास, ७८ टक्के जागा खुली होणार

googlenewsNext

मुंबई -  देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणाऱ्या कोस्टल रोडमुळे केवळ प्रवास सुसाट न होता, मुंबईकरांना ‘मोकळा श्वास’ही घेता येणार आहे. कोस्टल रोडसाठी ९० टक्के भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. यापैकी ७८ टक्के जागेवर प्रसाधनगृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरू उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठी उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बसथांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमिगत पदपथाचा समावेश असणार आहे. त्यामुळे देशातील हा पहिला प्रकल्प मुंबईकरांनाही मोकळा श्वास घेण्याची संधी देणार आहे.
त्याचबरोबर एक हजार ६२५ एवढी वाहन क्षमता असलेल्या तीन भूमिगत वाहनतळांचाही यात समावेश असणार आहे. मुंबईच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाला नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी-वांद्रे सी-लिंक दरम्यान हा सागरी मार्ग बांधण्यास आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवलीपर्यंत मुंबईकरांचा प्रवास सुसाट करणाºया प्रकल्पामुळे ९६ लाख ८७ हजार ५१० चौरस फुटांचे भराव क्षेत्रही उपलब्ध होणार आहे. या भराव क्षेत्रात मुंबईकरांचे मनोरंजन व विरंगुळ्याचीही पुरेपूर काळजी घेतली आहे.

तीन भूमिगत वाहनतळ

महालक्ष्मी मंदिर व हाजीअली दर्गा येथे पहिले, अमर सन्स गार्डनजवळ दुसरे, तर वरळी डेअरी व वरळी सी-फेस येथे तिसरे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. तिन्ही वाहनतळांची एकूण वाहनक्षमता एक हजार ६२५ एवढी असणार आहे.
तिन्ही वाहनतळ भूमिगत असणार असून, त्यांच्या छतावर उद्यान व खेळाचे मैदान
विकसित करण्याचेही प्रस्तावित आहे.

जॉगिंग ट्रॅक व सायकल ट्रॅक
आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित व्यायामाची गरज आहे. त्यामुळे येथे स्वतंत्र ‘जॉगिंग ट्रॅक’ व ‘सायकल ट्रॅक’ उभारण्याचे प्रस्तावित आहे.

फुलपाखरू उद्यान
केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाच्या अटीनुसार भराव क्षेत्रामध्ये एक ‘फुलपाखरु उद्यान’ विकसित करण्यात येणार आहे. यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title:  The coastal road will open the mouthpiece of Mumbai, 78 percent of the seats will be open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.