सरकारच्या हुकुमशाहीविरोधात काँग्रेसची तिंरगा पदयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 05:23 PM2019-03-09T17:23:16+5:302019-03-09T17:25:55+5:30
केंद्रातील व राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या हुकुमशाही कारभारामुळे संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे असा आरोप काँग्रेसने संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी तिरंगा पदयात्रा काढली.
मुंबई - केंद्रातील व राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या हुकुमशाही कारभारामुळे संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे असा आरोप काँग्रेसने संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी तिरंगा पदयात्रा काढली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सेवादलाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी टिळक भवन दादर येथून तिरंगा पदयात्रेत सहभाग घेतला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांच्या अध्यक्षतेखाली सेवादलाच्या कोकण विभागाची बैठक पार पडली या बैठकीला सेवादलाचे महाराष्ट्र प्रभारी मंगलसिंग सोळंकी यांच्यासह कोकण विभागातील पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर दुपारी १ वाजता सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम येथून तिरंगा पदयात्रा काढली. हातात तिरंगा झेंडे घेऊन शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. ही पदयात्रा पुढे म्हात्रे पेन इंडस्ट्रीज - शारदाश्रम - दादर पोलीस स्टेशन मार्गे टिळक भवन येथे पोहोचली व यात्रेचा समारोप झाला.
प्रदेश काँग्रेस सेवादलाचे सरचिटणीस संजय तायडे पाटील, महिला प्रदेश संघटक वृषाली वाघचौरे, शेखर पाटील, रतन तिवारी, राहुल खटके, व्ही. एस. राजगोपालन, मोनिका पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या पदाधिकारी, आमदारांनीही शहरात ठिकठिकाणी विजयी संकल्प रॅली काढली होती, या बाईक रॅलीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगामी लोकसभेत पुन्हा भाजपला मतदान कऱण्याचे आवाहन लोकांना केले होते. देशात आणि राज्यात सगळीकडे निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. काही दिवसांत आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग करू शकते,