ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 06:24 AM2024-05-07T06:24:35+5:302024-05-07T06:24:52+5:30

खारदांड्यात महायुती आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. तेव्हा ठाकरे गटाचे शाखाप्रमुख चिंतामणी निवटे यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि त्यावरून दोन्ही गटांत वाद निर्माण झाला.

Controversy between Thackeray group and Mahayuti workers; A case of preaching bright nikams | ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग

ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : खारदांडा येथे सोमवारी सकाळी ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील प्रकार टळला. महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचार रॅलीवेळी हा प्रकार घडला. 

खारदांड्यात महायुती आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. तेव्हा ठाकरे गटाचे शाखाप्रमुख चिंतामणी निवटे यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि त्यावरून दोन्ही गटांत वाद निर्माण झाला. तणाव वाढून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शाखेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या सांताक्रुज आणि खार पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला पांगविले.

या सगळ्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून आम्ही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता ठेवण्याचे आवाहन दोन्ही गटांना केल्याचे खार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Controversy between Thackeray group and Mahayuti workers; A case of preaching bright nikams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.