धायगुडे रेकॉर्ड्स गिनीज बुकमध्ये
By Admin | Published: August 29, 2016 05:22 AM2016-08-29T05:22:09+5:302016-08-29T05:22:09+5:30
२५० ते ३०० किलो वजनाच्या बाइक १२२ वेळा पोटावरून नेत पंडित धायगुडे यांनी रविवारी या विश्वविक्रमातून आपले नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे.
मुंबई : २५० ते ३०० किलो वजनाच्या बाइक १२२ वेळा पोटावरून नेत पंडित धायगुडे यांनी रविवारी या विश्वविक्रमातून आपले नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे. विश्वविक्रम साधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धायगुडे यांच्या विक्रमामुळे त्यांनी देशाचे नाव उंचावले आहे.
मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहाच्या प्रांगणात या विश्वविक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंगावरून सुमारे १२२ गाड्या नेण्याचा विश्वविक्रम धायगुडे यांनी केला आहे. धायगुडे यांच्या अंगावरून तब्बल २५० ते ३०० किलो वजनाच्या १२१ गाड्या नेल्या; तर शेवटची १२२वी गाडी तब्बल ४५० किलो वजनाची इंडियाज स्कॉट होती. याआधी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये १० गाड्या अंगावरून नेण्याचा विक्रम करण्यात होता. पंडित धायगुडे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई आहेत. ते मार्शल आर्टच्या ज्युदो, कराटेमध्येही पारंगत आहेत. (प्रतिनिधी)