इंधनापाठोपाठ विजेचा 'झटका'; महागाईने हैराण झालेल्या राज्यवासीयांवर महावितरणचा भार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 06:32 PM2018-09-12T18:32:54+5:302018-09-12T18:42:42+5:30
ऐन गणेशोत्सव सणाच्या तोंडावर वीजबील दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशभक्तांना वीजदरवाढीचा शॉक बसणार आहे.
मुंबईः पेट्रोल, डिझेल दरवाढीचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्रवासीयांना आता राज्य वीज नियामक आयोगाने 'झटका' दिला आहे. महावितरणची वीज महाग झाल्यानं राज्यवासीयांच्या खिशावर भार पडणार आहे.
शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या विजेचा दर सध्या ३.३५ रुपये प्रती युनिट होता. तो आता ३.५५ रुपये करण्यात आला आहे. घरगुती वापरासाठीच्या विजेचे दरही वाढवण्यात आल्याची माहिती एमईआरसीचे प्रमुख आनंद कुलकर्णी यांनी दिली.
घरगुती वापरसाठीच्या विजेचा दर १०० युनिटपर्यंत ५.०७ रुपये प्रती युनिट आणि १०१ ते ३०० युनिटपर्यंतचा दर ८.७४ रुपये प्रती युनिट होता. तो आता अनुक्रमे ५.३१ रुपये प्रती युनिट आणि ८.९५ रुपये प्रति युनिट होणार आहे.