एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : परळ, केईएम आणि लॉर्ड एलफिन्स्टन एक दुर्दैवी योग

By अोंकार करंबेळकर | Published: September 30, 2017 02:22 AM2017-09-30T02:22:58+5:302017-09-30T02:23:37+5:30

ज्या स्थानकावर आज चेंगराचेंगरीची अत्यंत दुर्देवी घटना घडली. त्या एलफिन्स्टन स्थानकाचे परळशी एेतिहासिक नाते आहे.

Elphinstone Stigmachine Disease: Parel, KEM, and Lord Elphinstone, an Unfortunate Yoga | एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : परळ, केईएम आणि लॉर्ड एलफिन्स्टन एक दुर्दैवी योग

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : परळ, केईएम आणि लॉर्ड एलफिन्स्टन एक दुर्दैवी योग

googlenewsNext

मुंबई - परळ आणि एलफिन्स्टन या स्थानकांना जोडणा-या पुलावर शुक्रवारी (दि.29) झालेल्या चेंगराचेंगरीमुळे २२ मुंबईकरांना नाहक प्राण गमवावे लागले. परळ आणि परिसरातील चाकरमानी आणि रहिवासी या दोन्ही स्थानकांचा वापर करतात. मात्र, ज्या स्थानकावर आज चेंगराचेंगरीची अत्यंत दुर्देवी घटना घडली. त्या एलफिन्स्टन स्थानकाचे परळशी एेतिहासिक नाते आहे.

१८६७ साली रेल्वे प्रवाशांच्या सेवेत आलेल्या या स्थानकाचे नाव मुंबईचे गव्हर्नर जॉन एलफिन्स्टन यांच्या स्मृतीसाठी देण्यात आले होते. माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन हे जॉन एलफिन्स्टन यांचे काका होते.  बहुतांशवेळेस एलफिन्स्टन म्हटलं की माऊंट स्टुअर्ट यांचंच नाव डोळ्यासमोर येतं. पण या स्थानकाला जॉन यांच्या नावावरुन नाव दिलंय हे बहुतेकांच्या लक्षात येत नाही.

सध्या वापरल्या जाणा-या मलबार हिल वरच्या बंगल्यापुर्वी गव्हर्नर हाऊस परळमध्येच होते. १७५७ ते १८८३ इतका प्रदीर्घ काळ परळमध्येच गव्हर्नर राहात असत. जॉन एलफिन्स्टनही परळमधील बंगल्यातच राहात होते. मलबार हिलवर गव्हर्नरांचे वसतीस्थान हलवल्यावर या बंगल्यात हाफकिन संस्था सुरु करण्यात आली. ज्या परळी वैजनाथाच्या नावाने परळ हे नाव मिळालं ते मंदिर याच जागेवर होतं. त्याच्याजागेवर जेसुईटांनी मठ बांधला व नंतर तेथे गव्हर्नरांना राहण्यास वसतीस्थान बांधण्यात आलं. एकाअर्थी हा सगळा भाग म्हणजे परळ गावाचा उगमबिंदूच मानला पाहिजे.

आज ही जागा या दोन्ही स्थानकांपासून चालत जाता येईल इतकी जवळ आहे. तर चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांवर जेथे उपचार करण्यात आले ते केईएम रुग्णालय त्याच्या अगदीच जवळ आहे. एलफिन्स्टन नाव बदलून स्थानकाला प्रभादेवी नाव दिलं असलं तरी परळ, केईएम आणि एलफिन्स्टन स्थानकाचा संबंध एका दुर्दैवी घटनेतून समोर आला. याच वर्षी या स्थानकाला एलफिन्स्टन नाव देऊन १५० वर्षे पूर्ण झाली आणि बरोबर दीडशे वर्षांनी त्याचे नाव बदलण्यात आले.

एलफिन्स्टन कोण होते ?...
जॉन एलफिन्स्टन यांच्या कारकिर्दीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये १८५७ चा उठाव झाला. या उठावाच्या काळामध्ये मुंबई प्रांतामध्ये विविध ठिकाणी झालेली लहानसहान बंडाची प्रकरणे त्यानी मिटवली.  १८५८साली राणी व्हिक्टोरियाने बंड शमवल्यानंतर काढलेला जाहीरनामा मुंबईतही वाचून दाखवला त्याप्रसंगीही जॉन एलफिन्स्टन हजर होते. १८५९ साली जॉन एलफिन्स्टन लंडनला पुन्हा निघून गेले आणि पुढच्याच वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

दक्षिण मुंबईतील एका दुलर्क्षित जागेवर बाग बांधून त्याच्या सभोवती इमारती बांधाव्यात अशी कल्पना तत्कालीन पोलीस कमिशनर चार्ल्स फोर्जेट यांनी मांडली. त्याला जॉन एलफिन्स्टन यांनी नंतर बार्टल फ्रिअर यांनी पाठिंबा दिला आणि मदतही केली. त्यानंतर या जागेवर बागेच्या विकासाला सुरुवात झाली आणि १८७२ साली ही बाग बांधून झाली. जॉन एलफिन्स्टन यांनी केलेल्या मदतीच्या आणि स्मृतीप्रित्यर्थ तिचे नाव एलफिन्स्टन सर्कल असे ठेवण्यात आले, स्वातंत्र्यानंतर बेंजामिन हॉर्निमन यांच्या नावाने बागेचे हॉर्निमन सर्कल असे करण्यात आले.

Web Title: Elphinstone Stigmachine Disease: Parel, KEM, and Lord Elphinstone, an Unfortunate Yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.