विद्यमान नाट्य संमेलनाध्यक्षांची ‘टर्म’ पुढे सुरू! मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:13 AM2018-02-10T01:13:03+5:302018-02-10T01:13:17+5:30

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेमुळे यंदाचे नाट्य संमेलन पुढे ढकलले गेले आहे. नाट्य परिषदेच्या निवडणुकीनंतर पदभार स्वीकारणाºया कार्यकारिणीच्या हाती आगामी नाट्य संमेलनाची सूत्रे राहणार आहेत.

Excerpts from the present drama meeting! The result of the election process of Marathi Natya Parishad | विद्यमान नाट्य संमेलनाध्यक्षांची ‘टर्म’ पुढे सुरू! मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेचा परिणाम

विद्यमान नाट्य संमेलनाध्यक्षांची ‘टर्म’ पुढे सुरू! मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेचा परिणाम

googlenewsNext

- राज चिंचणकर

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेमुळे यंदाचे नाट्य संमेलन पुढे ढकलले गेले आहे. नाट्य परिषदेच्या निवडणुकीनंतर पदभार स्वीकारणाºया कार्यकारिणीच्या हाती आगामी नाट्य संमेलनाची सूत्रे राहणार आहेत. त्यामुळे नाट्य संमेलन नक्की कधी होईल, याची काहीच निश्चिती नाही, परंतु पुढील नाट्य संमेलनाचा पडदा वर जाईपर्यंत, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष जयंत सावरकर यांची ‘टर्म’ पुढे सुरू राहणार, हे मात्र निश्चित आहे.
यंदाच्या नाट्य संमेलनाच्या आयोजनावर सध्यातरी पडदा पडलेला असला, तरी ४ मार्च रोजी होणाºया निवडणुकीनंतर नाट्य परिषदेच्या नव्या कार्यकारिणीने उत्साह दाखविल्यास, नाट्य संमेलन प्राधान्याने आयोजित करता येणे कठीण नाही, परंतु चालू आर्थिक वर्षात मात्र, निवडणुकीनंतर हाती उपलब्ध होणाºया वेळेत नाट्य संमेलन होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यानंतर, ऐन उन्हाळ्यात किंवा भर पावसाळ्यात नाट्य संमेलन आयोजित केले जाईल, याबद्दलही खात्री नाही.
परिणामी, जयंत सावरकर यांना नाट्य संमेलनाध्यक्ष या नात्याने, नाट्यक्षेत्राशी संबंधित ठोस उपक्रम राबविण्यास अधिक वेळ मिळणार आहे.
यंदा नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नाट्य परिषदेची घटना दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यात नाट्य संमेलनाध्यक्षांना विविध उपक्रम राबविण्यास वार्षिक दीड लाख रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. साहजिकच, या निधीचा विनियोग करणारे जयंत सावरकर हे नाट्य परिषदेच्या इतिहासातले पहिले नाट्य संमेलनाध्यक्ष ठरणार आहेत.

निधीचा उपयोग शिबिरांसाठी
एका संमेलनापासून दुसºया संमेलनापर्यंत, असा नाट्य संमेलनाध्यक्षांचा कार्यकाळ असल्याने, जर या वर्षी नाट्य संमेलन झाले नाही, तर माझे अध्यक्षपद पुढेही सुरू राहील. त्यामुळे उपलब्ध करून दिलेल्या निधीचा योग्य वापर करण्याची मला संधी मिळेल. ४ मार्चला नाट्य परिषदेची निवडणूक झाल्यावर महाराष्ट्रात जिथे-जिथे नाट्य परिषदेच्या शाखा आहेत, तिथे नाट्य शिबिरे घेऊन तिथल्या लोकांना नाट्यविषयक मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
- जयंत सावरकर, नाट्य संमेलनाध्यक्ष

Web Title: Excerpts from the present drama meeting! The result of the election process of Marathi Natya Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई