टिळकनगर स्टेशनजवळील इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 08:31 PM2018-12-27T20:31:36+5:302018-12-27T20:32:04+5:30
सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून कुलिंग ऑपरेशन सुरू
मुंबई - काही दिवसांपूर्वीच अंधेरीतील कामगार रुग्णालयात अग्नितांडवात ११ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच टिळक नगर येथील सरगम सोसायटीतील इमारत क्रमांक ३५ मधील १४ व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. आज रात्री ७.५१ वाजताच्या सुमारास लागलेली ही आग आता आटोक्यात आली असून अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
#UPDATE 3 dead after a level-3 fire broke out on the 14th floor of Sargam Society in Chembur, Mumbai. Firefighting operation still underway. #Maharashtrahttps://t.co/m5xDv2RGoX
— ANI (@ANI) December 27, 2018
टिळक नगर येथील गणेश गार्डनजवळ सरगम सोसायटी आहे. या सोसायटीत 15 मजली इमारत असून यामधील ३५ क्रमांकाच्या इमारतीच्या बी विंगमधील १४ व्या मजल्यावर आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी ५ फायर इंजिनसह अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. यासोबतच पोलिसदेखील घटनास्थळी पोहोचले होते. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सुनिता जोशी (72), भालचंद्र जोशी (72), सुमन श्रीनिवास जोशी (83), सरला सुरेश गांगर (52) आणि लक्ष्मीबेन प्रेमजी गांगर (83) अशी मृतांची नावे आहेत. तर श्रीनिवास जोशी (86) आणि अग्निशमन दलाचा जवान छगन सिंह (28) हे जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अग्नितांडवात मृत्यू पावलेल्या सुनिता जोशी या विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर संजय जोशी यांच्या मातोश्री होत्या.
#UPDATE 5 dead and 2 people injured including a fireman in the fire that broke out on 14th floor of Sargam Society in Chembur, Mumbai. Firefighting operation still underway. #Maharashtrahttps://t.co/4pIHbD70xF
— ANI (@ANI) December 27, 2018
टिळक नगर येथील गणेश गार्डनजवळ सरगम सोसायटी आहे. या सोसायटीच्या १५ मजली इमारत क्रमांक ३५, बी विंगच्या १४ व्या मजल्यावर आग लागली असून घटनास्थळी ५ फायर इंजिनसह अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 27, 2018
#UPDATE Chembur, Mumbai: Fire on the 14th floor of Sargam Society near Ganesh Garden in Tilak Nagar has been declared as level-3 fire. pic.twitter.com/k36wnJBHKS
— ANI (@ANI) December 27, 2018