पहिले वस्त्रोद्योग संग्रहालय नवीन वर्षात साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:22 AM2017-12-28T02:22:45+5:302017-12-28T02:23:04+5:30

मुंबईतील पहिल्या वस्त्रोद्योग संग्रहालयाची उभारणी अखेर नवीन वर्षात होणार आहे. मुंबईचे वैभव असलेल्या गिरणी उद्योगाची स्मृती जपण्यासाठी काळाचौकी येथे हे संग्रहालय उभे राहणार आहे.

The first textile museum will be rolled out in the new year | पहिले वस्त्रोद्योग संग्रहालय नवीन वर्षात साकारणार

पहिले वस्त्रोद्योग संग्रहालय नवीन वर्षात साकारणार

Next

मुंबई : मुंबईतील पहिल्या वस्त्रोद्योग संग्रहालयाची उभारणी अखेर नवीन वर्षात होणार आहे. मुंबईचे वैभव असलेल्या गिरणी उद्योगाची स्मृती जपण्यासाठी काळाचौकी येथे हे संग्रहालय उभे राहणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग सात वर्षांनंतर अखेर मोकळा होत आहे.
१९८२मध्ये झालेल्या ऐतिहासिक संपामुळे गिरण्या मुंबईतून नामशेष झाल्या. त्यामुळे एकेकाळी मुंबईचे वैभव असलेल्या या वस्त्रोद्योगाची स्मृती पुसली जाऊ नये, यासाठी काळाचौकी येथे केंद्र सरकारच्या युनायटेड टेक्सटाईल मिल क्रमांक २ व ३च्या भूखंडांवर वस्त्रोद्योग वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय २०११मध्ये घेण्यात आला होता. त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली. मात्र मिलच्या जागेत बदल करण्यास पुरातन वास्तू समितीकडून आक्षेप घेण्यात आला होता. तसेच या प्रकल्पासाठी खर्च पालिका करणार की केंद्र सरकार, असा सवालही समितीने उपस्थित केला होता. त्यामुळे तब्बल ७ वर्षे हा प्रकल्प रखडत राहिला होता. अखेर गेल्या आठवड्यात या संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी बैठक घेण्यात आली. लवकरच या कामासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. या कामाचे महत्त्व व अनुभव लक्षात घेता सल्लागार म्हणून सरकारी उच्च दर्जाची संस्था म्हणून सर जे.जे. कॉलेज आॅफ आॅर्किटेक्चर यांना सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यावर शिक्कामोर्तब झाले. काळाचौकीतील १६ एकर जमिनीवर हे संग्रहालय उभे राहणार आहे. १४ एकरवर संग्रहालयाचे बांधकाम तर उर्वरित जागेवर सौंदर्यीकरण केले जाणार आहे.
वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून मुंबईतील शंभर वर्षे जुने गिरणगावच साकारणार आहे. कापड उद्योग ग्राम या संकल्पनेवर हे वस्तुसंग्रहालय विकसित केले जाणार आहे.
या प्रकल्पावर पालिका तीनशे कोटी रुपये खर्च करणार असून सल्लागारांना १५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
असे असेल वस्तुसंग्रहालय
गिरणगावातील कामकाजाची पद्धत, जुने यंत्र व कामगार
कामगारांचे दैनंदिन जीवन, त्यांचे राहणीमान, चाळींची प्रतिकृती
गिरणीच्या परिसरात उदयास आलेली संस्कृती
पहिल्या टप्प्यात एॅम्पी थिएटर, बसण्याची आसने, तलाव आणि कॅफेटेरिया असणार
आहे. यासाठी सहा कोटी ६० लाख रुपये
खर्च करण्यात येणार आहेत. तसेच
तलावाच्या मध्यभागी कारंजे,
गिरणगावचा इतिहास दाखविणारा लेजर शो असणार आहे.

Web Title: The first textile museum will be rolled out in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.