मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस, मिळेल त्या गाडीनं घरी पोहोचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 06:24 PM2017-09-19T18:24:06+5:302017-09-19T18:29:53+5:30

सकाळपासून मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागत आहेत तरी प्रवाशांना विनंती आहे....

Get wind along with windy winds in Mumbai and get back to that vehicle | मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस, मिळेल त्या गाडीनं घरी पोहोचा

मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस, मिळेल त्या गाडीनं घरी पोहोचा

Next
ठळक मुद्देगेल्या महिन्यातील 29 ऑगस्टच्या पावसात झालेलं हाल लक्षात घेता चाकरमान्यांनी घरची वाट धरली. मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरील लोकल गाड्या एरव्हीपेक्षा दोनन तास आधीपासूनच गर्दीने फुल्लसायन, दादर, परळ, फोर्ट भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.  पुढील 24 तास अशाच मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला

मुंबई, दि. 19 - सकाळपासून मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागत आहेत तरी प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी मिळेल त्या गाडीने प्रवास करून लवकरात लवकर आपल्या गंतव्य स्थानी पोहोचावे. तसेच गरज असेल तरच प्रवास करावा. असे अवाहन मध्य रेल्वेच्या मध्यवर्ती सूचना प्रसारण कक्षाकडून करण्यात आलं आहे. 

गेल्या महिन्यातील 29 ऑगस्टच्या पावसात झालेलं हाल लक्षात घेता चाकरमान्यांनी घरची वाट धरली. तिन्ही मार्गावरील लोकलमध्ये तुडुंब गर्दी झाली आहे. गणेशोत्सव काळात पडलेल्या प्रचंड पावसाचा चाकरमान्यांनी धसका घेत मंगळवारी पडलेल्या पावसामुळे कामावरून लवकर घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरील लोकल गाड्या एरव्हीपेक्षा दोनन तास आधीपासूनच गर्दीने फुल्ल झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली. त्यामुळे कर्जत, कसारा, बदलापूर, टिटवाला, कल्याण मार्गावरील लोकलमध्ये गर्दी झाली आहे.

ठाण्यापुढे लोकलचा वेग मंदावला असून डाऊन मार्गावर ठाणे ते डोंबिवली प्रवासासाठी पंचवीस मिनिटे लागत आहेत. तर कुर्ला ते ठाणे मार्गावर पावसाचा जोर कमी असल्याने तेथे सद्यातरी गाड्यांचा वेग सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. सांताक्रूझ-विलेपार्ले दरम्यान रेल्वे ट्रॅकवर झाड कोसळल्याने हार्बर रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अंधेरी-सीएसएमटी मार्गावर वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे तसेच मध्य रेल्वेची वाहतूकही 15 मिनिट उशिराने सुरु आहे. मंगळवार दुपारपासून मुंबईत पावसाने जोर पकडला आहे. सखल भागात कुठे पाणी साचल्याचे वृत्त नसले तरी, उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर उपनगरात दुपारपासून धुवाँधार पावसाने दमदार बॅटिंग सुरू केलीये. सायन, दादर, परळ, फोर्ट भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.  पुढील 24 तास अशाच मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
29 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई थांबली होती. त्यादिवशी अनेक चाकरमानी अडकले होते. मुसळधार पावसाचा अंदाज पाहता अनेक चाकरमान्यांनी अर्धी सुट्टी टाकून घरचा रस्ता पकडला आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह दादर, लोअर परेल,वांद्रे रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांनी गर्दी केलीये. संध्याकाळची वेळ असल्यामुळे त्यातच आणखी गर्दी झालीये. तसंच पश्चिम महामार्ग आणि इस्टर्न एक्स्प्रेसवर आताच ट्रॅफिक जाम होण्यास सुरुवात झाल्याचे वृत्त आहे. वांद्रे, शीव, माटुंगा, दादर खोदादाद सर्कल, हिंदमाता, परेल आदी भागात ट्रॅफिक जाम झालीये. 

समुद्रात 60 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहत, तुफानी लाटा निर्माण होणार असल्याने धोक्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर समुद्रातील सर्व बोटींनी जवळच्या किनाऱ्याच्या आश्रय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.दुपार पासून वायरलेस वर संपर्क होत असलेल्या बोटीचा मुसळधार पावसामुळे संपर्क तुटला असून  जिल्ह्यातील सुमारे 400 ते 500 बोटी अजूनही समुद्रात असल्याचे समजते. 

Web Title: Get wind along with windy winds in Mumbai and get back to that vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.