कांदा उत्पादकांना क्विंटलमागे २०० रुपये अनुदान देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 06:05 AM2018-12-21T06:05:12+5:302018-12-21T06:05:42+5:30
गेल्या दीड महिन्यात व्यवहार केलेल्यांना फायदा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोसळलेल्या भावामुळे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी हा निर्णय लागू असेल. हे अनुदान थेट बँक हस्तांतरणाद्धारे शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. या योजनेसाठी एकूण १५० कोटींचा निधीही मंत्रिमंडळाने मंजूर केला. एकट्या नोव्हेंबरमध्ये विविध बाजार समित्यांत ४१.२३ लाख क्विंटल कांद्याची आवक झाली.
आजच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाकडून कांद्यासाठी देण्यात आलेले आजवरचे हे सर्वात मोठे अनुदान असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. कांदाप्रश्नी ठिकठिकाणी (पान १२ वर)