रुग्णवाहिकेला रस्ता द्या

By Admin | Published: June 14, 2014 02:30 AM2014-06-14T02:30:59+5:302014-06-14T02:30:59+5:30

अपघात झाल्यावर एका तासाच्या (गोल्डन अवर) आत जखमीला रुग्णालयामध्ये पोहोचवणे अत्यंत गरजेचे असते

Give the ambulance a road | रुग्णवाहिकेला रस्ता द्या

रुग्णवाहिकेला रस्ता द्या

googlenewsNext

मुंबई : अपघात झाल्यावर एका तासाच्या (गोल्डन अवर) आत जखमीला रुग्णालयामध्ये पोहोचवणे अत्यंत गरजेचे असते. मात्र गेल्या काही वर्षांत मुंबईमध्ये गाड्यांची वाढती संख्या आणि ट्रॅफिकमुळे अनेकदा जखमीला रुग्णालयात घेऊन जाण्यास उशीर होतो. ट्रॅफिक कमी करण्यासाठी असोसिएशन आॅफ मेडिकल कन्सल्टंट (एएमसी) या संस्थेने पुढाकार घेतला आहे.
ट्रॅफिकमुळे मुंबईत वायुप्रदूषणामध्येही वाढ होते आहे. ट्रॅफिकमुळे अनेक मुंबईकर रोज त्रस्त झालेले दिसतात. उशीर होतो, हे प्रमुख कारण असले तरी या ट्रॅफिकमुळे आरोग्यावरही अनेक परिणाम होतात. गर्भधारणा होताना काही गुंतागुंत उद्भवते, लहान मुलांना मानसशास्त्रीय समस्या उद्भवतात, हे सर्व ट्रॅफिकमुळे होत असल्याचे एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले असल्याचे एएमसीच्या अध्यक्षा डॉ. संगीता पिकले यांनी सांगितले.
मुंबईकरांना या ट्रॅफिकच्या समस्येतून सोडवण्यास व जनजागृती करण्यास एएमसीने पुढाकार घेतला आहे. २९ जून हा ‘नो हॉकिंग डे’ म्हणून साजरा केला जाणार आहे. ट्रॅफिकची समस्या सोडवण्यास काय करावे, याबदलच्या मागण्या या दिवशी प्रकाशित केले जाणार असल्याचे डॉ. पिकले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Give the ambulance a road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.