मध्य रेल्वे मुख्यालयाची ‘हेरिटेज’ ओळख जाणार!, जागतिक दर्जाचे वस्तुसंग्रहालय उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 04:10 AM2017-12-04T04:10:35+5:302017-12-04T04:10:56+5:30
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयाची जागा बदलण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वे मुख्यालयाला असलेला ‘हेरिटेज टॅग’ लवकरच पुसला जाणार आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयाची जागा बदलण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वे मुख्यालयाला असलेला ‘हेरिटेज टॅग’ लवकरच पुसला जाणार आहे. महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली. सीएसएमटी येथून जवळच मध्य रेल्वेच्या मुख्यालयाची नवीन इमारत असणार आहे.
१८७८ ते १८८८ या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारत उभारण्यात आली होती. सद्य:स्थितीत या इमारतीतील रेल्वे कार्यालयांमध्ये ४०० कर्मचारी कार्यरत आहेत. युनेस्कोने जागतिक वारसा यादीत सीएसएमटी येथील इमारतीला स्थान दिले आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय दुसºया जागी नेण्याचा निर्णय झाला आहे. पर्यायी मुख्यालय म्हणून रेल्वे अखत्यारीत असलेल्या पी. डीमेलो मार्गावरील पाच मजली इमारतीची जागा निश्चित करण्यात आली आहे, असे पत्र मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी रेल्वे बोर्डाचे अश्वनी लोहाणी यांना पाठविले.
‘नवीन कार्यालय उभारण्यासाठी मध्य रेल्वेच्या २०१८-१९ आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. मुख्यालय दुसºया जागी नेण्याची प्रक्रिया तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे,’ असा मजकूर या पत्रात लिहिला आहे.
जागतिक दर्जाचे वस्तुसंग्रहालय उभारणार
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. यामुळे येथे जागतिक दर्जाचे रेल्वे वस्तुसंग्रहालय बनविण्याच्या सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली. २७ नोव्हेंबर रोजी रेल्वेमंत्री मुंबई दौºयावर होते. एल्फिन्स्टन लष्करी पुलाच्या कामाची पाहणी पूर्ण झाल्यानंतर सीएसएमटी येथे भेट दिली. सीएसएमटी येथील वस्तुसंग्रहालयाचीदेखील पाहणी गोयल यांनी केली. पाहणी करताना गोयल यांच्यासमवेत कला दिग्दर्शक नितीन देसाई, तर इनटॅकच्या उपाध्यक्षा (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज) तसनीम मेहता इ. उपस्थित होते. या
वेळी रेल्वेमंत्र्यांनी जागतिक दर्जाच्या संग्रहालयाबाबत सूचना केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.