जाणून घ्या, म्हाडाच्या लॉटरीत कुठे किती घरं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 05:27 PM2018-11-03T17:27:51+5:302018-11-03T17:28:11+5:30

म्हाडाची ही लॉटरी ११९४ घरांची असेल, असं सांगण्यात आलं होतं. परंतु, त्यात तब्बल १९० घरांची वाढ झाली आहे.

how many houses are there in MHADA lottery 2018? | जाणून घ्या, म्हाडाच्या लॉटरीत कुठे किती घरं? 

जाणून घ्या, म्हाडाच्या लॉटरीत कुठे किती घरं? 

म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी १६ डिसेंबरला फुटणार आहे. या लॉटरीत एकूण १,३८४ सदनिका असून त्यापैकी सर्वाधिक घरं मानखुर्दमध्ये आहेत. त्या खालोखाल अॅन्टॉप हिलचा आणि नंतर मुलुंडचा क्रमांक लागतो. 

म्हाडाने या वर्षी घरांसाठी किमतीचे नवीन धोरण तयार केले आहे. त्यानुसार म्हाडाच्या घरांच्या किमती या वर्षी २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. जास्तीतजास्त मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांच्या लॉटरीमध्ये सहभागी व्हायला मिळावे हा यामागचा उद्देश आहे. म्हाडाची ही लॉटरी ११९४ घरांची असेल, असं सांगण्यात आलं होतं. परंतु, त्यात तब्बल १९० घरांची वाढ झाली आहे.
 
कुठे, किती घरं?

अॅन्टॉप हिल, वडाळा - २७८ सदनिका
प्रतीक्षानगर, सायन - ८९ सदनिका
गव्हाणपाडा, मुलुंड - २६९ सदनिका
पी. एम. जी. पी. मानखुर्द - ३१६ सदनिका
सिद्धार्थ नगर, गोरेगाव (प) - २४ सदनिका
महावीरनगर, कांदिवली (प) - १७० सदनिका
तुंगा, पवई - १०१ सदनिका
मुं. इ. दु. व पु. मंडळामार्फत प्राप्त सदनिका - ५०
विकास नियंत्रण विनियम ३३ (५) अंतर्गत - १९ सदनिका
विखुरलेल्या सदनिका - ६८
 
म्हाडाच्या सोडतीचं वेळापत्रक

>> ५ नोव्हेंबर २०१८ - जाहिरात प्रसिद्धी आणि ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी सुरुवात

>> १० डिसेंबर २०१८ - अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख

>> १६ डिसेंबर २०१८ - सोडतीचा दिनांक

उत्पन्न गटानुसार वर्गीकरण

अत्यल्प उत्पन्न गटः २५ हजार रुपयांपर्यंत
अल्प उत्पन्न गटः २५,००१ रुपये ते ५०,००० रुपये
मध्यम उत्पन्न गटः ५०,००१ रुपये ते ७५,००० रुपये
उच्च उत्पन्न गटः ७५,००१ रुपये व त्यापेक्षा अधिक

 

Web Title: how many houses are there in MHADA lottery 2018?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा