शासनमान्य मागण्यांची अंमलबजावणी करा, शिक्षकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 02:04 AM2017-12-20T02:04:18+5:302017-12-20T02:04:35+5:30

मुंबईसह राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी विविध मागण्यांच्या पूर्र्ततेतासाठी मंगळवाारी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक दिली. शासनमान्य मागण्यांची अंमलबजावणी करा, शिक्षणविरोधी निर्णय रद्द करा, अशा मागण्या आझाद मैदानात झालेल्या आंदोलनावेळी मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केल्या.

Implement government demands, teachers fall on the Collector's office | शासनमान्य मागण्यांची अंमलबजावणी करा, शिक्षकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

शासनमान्य मागण्यांची अंमलबजावणी करा, शिक्षकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Next

मुंबई : मुंबईसह राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी विविध मागण्यांच्या पूर्र्ततेतासाठी मंगळवाारी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक दिली. शासनमान्य मागण्यांची अंमलबजावणी करा, शिक्षणविरोधी निर्णय रद्द करा, अशा मागण्या आझाद मैदानात झालेल्या आंदोलनावेळी मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केल्या. या आंदोलनात शेकडो शिक्षकांनी धरणे देत प्रशासनाचे लक्ष वेधले. शिक्षण विभागाच्या ढिसाळ कामकाजाविरोधात आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या. आझाद मैदानात आंदोलन सुरू असताना सायंकाळी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अमर सिंग आणि सल्लागार मुकुंद आंधळकर यांनी मुंबई शहराचे उपनिवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. शिवाय उपनिवासी जिल्हाधिकाºयांना शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले.
याआधी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात शिक्षकांनी ८ डिसेंबर रोजी राज्यभरातील तहसील कार्यालयांवर धरणे दिले होते. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य असून विधिमंडळात घोषणा करण्याचे आश्वासित केले होते. मात्र अधिवेशनादरम्यान अद्यापही शिक्षकांच्या मान्य मागण्यांबाबत निर्णय घोषित झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी आक्रमक होत दुसºया टप्प्यातील आंदोलन केले. यापुढे तिसºया टप्प्यात १८ जानेवारी २०१८ रोजी विभागीय शिक्षण निरीक्षकांच्या कार्यालयांवर धडक मोर्चे काढणार असल्याचे संघटनेने सांगितले. त्यानंतरही सरकारला जाग आली नाही, तर २ फेब्रुवारी म्हणजेच परीक्षा कालावधीत सर्व महाविद्यालयांतील शिक्षक बेमुदत संपावर जातील, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Web Title: Implement government demands, teachers fall on the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक