‘कौन बनेगा करोडपती’ आजपासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 06:20 AM2017-08-28T06:20:58+5:302017-08-28T06:21:45+5:30
‘देवीयों और सज्जनों’ आणि ‘लॉक किया जाए’ ही खर्जातली आणि दमदार आवाजातील वाक्य सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून पुन्हा ऐकायला मिळणार आहेत. कारण बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ हा भव्य कार्यक्रम घेऊन येत आहेत.
मुंबई : ‘देवीयों और सज्जनों’ आणि ‘लॉक किया जाए’ ही खर्जातली आणि दमदार आवाजातील वाक्य सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून पुन्हा ऐकायला मिळणार आहेत. कारण बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ हा भव्य कार्यक्रम घेऊन येत आहेत. कार्यक्रमाचे हे ९वे सत्र असून त्यात स्पर्धकांना सर्वाधिक तब्बल ७ कोटी रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. आज (सोमवार)पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे.
मर्यादित भागांच्या ‘केबीसी९’ या सत्रात नवीन लाइफलाइन्स व आकर्षक बदल दिसणार आहेत. ‘फोन-अ-फ्रेंड’ ही लाइफलाइन आता ‘व्हिडिओ-अ-फ्रेंड’ अशी असेल. तसेच ‘जोडीदार’ ही नवी लाइफलाइन असून त्यात स्पर्धक आपल्या जोडीदारालाही हॉट सीटवर आणू शकणार आहेत. त्याचबरोबर ‘सर्व काही किंवा काहीच नाही’ असा नवा सौदा या सत्रात असेल. ‘जॅकपॉट’चा प्रश्न या वेळी ७ कोटी रुपयांचा असून या वेळी बक्षीसे धनादेशाऐवजी अॅक्सिस बँकेमार्फत थेट विजेत्याच्या खात्यात जमा केली जातील. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी केवळ ७ दिवसांत तब्बल १९.८ दशलक्ष लोकांनी नोंदणी केली आहे.
या सत्रातील खास भागांमध्ये समाजासाठी योगदान देणाºया खºया हिरोंना आमंत्रित करण्यात येणार आहे. या थोर व्यक्तींना खेळ खेळण्याचीच नव्हे, तर त्यांचे काम देशातील जनतेपर्यंत पोहोचविण्याची आणि त्यात देशाची मदत मागण्याचीही संधी मिळणार आहे.‘केबीसी९’मध्ये जियोच्या सबस्क्राइबर्सना ‘घर बैठे जॅकपॉट जीतो’च्या माध्यमातून दररोज ‘डाट्सन रेडी-गो’ कार जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच टीव्हीवर सुरू खेळासोबत ‘प्ले अलॉन्ग’चा पर्याय वापरून जियो सबस्क्राईबर्स ज्ञानवृद्धी करून घेऊ शकतात. ‘बिग सिनर्जी’द्वारा निर्मित ‘कौन बनेगा करोडपती ९’चे प्रायोजक व्हीवो, जियो, चिंग्ज, डाट्सन, रेमांड, अॅक्सिस बँक, आकाश ट्यूटोरियल, बिग बझार आणि क्विक हील हे आहेत.
केबीसी हा सर्व थरातील लोकांना जवळचा वाटणारा खेळ आहे. ज्ञानाच्या सामर्थ्याने यश मिळवता येते, हे या शो ने दाखवून दिले आहे.
-एनपी सिंह, सीईओ,
सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया.
वेगवान, रोमांचक आणि आधुनिक तंत्रज्ञांनाने परिपूर्ण आणि अमिताभ बच्चनसारखे लोकप्रिय सूत्रसंचालक लाभलेले असे केबीसीचे नववे सत्र सादर करताना सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनला आनंद होत आहे.
- दानिश खान, ईव्हीपी आणि व्यवसाय प्रमुख, सोन्
टी)‘कौन बनेगा करोडपती’ सामान्य माणसाच्या स्वप्नांचा आणि आकांक्षांचा गौरव करतो. हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा आहे आणि याच्या नवव्या सत्राचे सूत्र संचालन करताना मला आनंद होत आहे.’
- अमिताभ बच्चन,
सुप्रसिद्ध अभिनेते.
‘हॉटसीटवर बसण्यासाठी झालेली प्रचंड नोंदणी पाहून या कार्यक्रमाकडून सर्वांच्याच अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत, हे दिसते.’
- सिद्धार्थ बसू.