खंडाळ्यातील जमिनी शेतकऱ्यांच्या संमतीने घेण्यात येतील : उद्योगमंत्री सुभाष देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 01:26 PM2019-01-21T13:26:50+5:302019-01-21T13:27:41+5:30
शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली.
मुंबई : खंडाळ्यातील शेतकऱ्यांकडून भू- अधिग्रहन करताना अन्याय झाल्याचा आरोप करण्यात येत होता. याविरोधात शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. यावेळी देसाई यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान झाल्याचा दावा केला.
पत्रकार परिषदेत बोलताना सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली. अधिग्रहन टप्पा 3 मधील जमिनींबाबत पर्यायी जमिनी शेतकऱ्यांच्या मर्जीनेच घेण्यात येतील. हरकती असलेल्या जमीनी अधिग्रहित करणार नाही, असे आश्वासन त्यांनी या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.
तसेच विविध कंपन्यामध्ये 3226 नोकऱ्या देण्यात आल्या. यापैकी 2 हजार जण स्थानिक आहेत. एमआयडीसीचे अधिकारी पुढील आठवड्यात या गावांना भेट देतील, असेही देसाई यांनी सांगितले.
खंडाळ्यातील शेतकऱ्यांनी मागण्या मान्य न झाल्यास जल समाधी घेण्याचा इशारा दिला होता.