अंधेरीत लेडिज बारवर छापा, २८ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 05:34 AM2018-02-03T05:34:56+5:302018-02-03T05:35:15+5:30
अंधेरीच्या ‘रामभवन लेडिज बार अँड रेस्टरंट’मध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकला. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यामध्ये २८ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अंधेरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई - अंधेरीच्या ‘रामभवन लेडिज बार अँड रेस्टरंट’मध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकला. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यामध्ये २८ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अंधेरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अंधेरीत पारशी पंचायत रोडवरील श्रीराम हाउसमध्ये हा बार आहे. या बारमध्ये अश्लील चाळे चालतात, अशी माहिती समाजसेवा शाखेला मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी घटनास्थळी सापळा रचून रात्री १२च्या सुमारास तिथे छापा टाकला. यामध्ये कॅशिअर, ३ वेटर्स आणि २४ ग्राहक अशा २८ जणांना ताब्यात घेत, स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे समाजसेवा शाखेच्या अधिकाºयांनी सांगितले. बारमध्ये काम करणा-या १२ बारगर्ल्सना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, या बारचा मालक आणि चालक फरार आहेत. बारमधून १ लाख ७१ हजार, २२० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. अंधेरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक चौकशी सुरू आहे.