लाखो प्रवासी; सुरक्षेसाठी केवळ शेकडो पोलीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 05:48 AM2018-05-03T05:48:01+5:302018-05-03T05:48:01+5:30

मुंबई उपनगरीय लोकलमधील प्रवासी संख्येचा आलेख उंचावतच आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एकूण प्रवासी संख्या लक्षात घेता

Lakhs of migrants; Only hundreds of police for safety! | लाखो प्रवासी; सुरक्षेसाठी केवळ शेकडो पोलीस!

लाखो प्रवासी; सुरक्षेसाठी केवळ शेकडो पोलीस!

Next

महेश चेमटे 
मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलमधील प्रवासी संख्येचा आलेख उंचावतच आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एकूण प्रवासी संख्या लक्षात घेता, स्थानकांवर लाखो प्रवाशांची वर्दळ सर्रास पाहायला मिळते. मात्र, या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त शेकडो रेल्वे पोलिसांच्या खांद्यावर आहे. विशेष म्हणजे, रेल्वे पोलीस मुख्यालयदेखील तब्बल २०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्रवासी संख्या रोडावली असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. देशात विशेषत: मुंबईत येणारा विदेशी पर्यटक आवर्जून सीएसएमटीला स्थानकाला भेट देतो. सीएसएमटी स्थानकातील सरासरी १ लाख ५४ हजार ५९७ प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी २६९ रेल्वे
पोलिस अधिकारी-कर्मचाºयांवर
आहे.
सीएसएमटी स्थानकांसाठी ३५० रेल्वे पोलिसांची पदे मंजूर असताना, अद्याप मध्य रेल्वेचे मुख्यालयच ७ सहायक पोलीस उपनिरीक्षकासह ८१ पोलिसांची पदे रिक्त आहेत.
मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, २०१४-१५ मध्ये ठाणे स्थानकाची प्रवासी संख्या २ लाख २८ हजार ६३७ होती. ती यंदा (२०१७-१८) २ लाख ६७ हजार ४१६ इतकी झाली आहे. चार वर्षांत ठाणे स्थानकातील प्रवासी संख्या २८ हजार ७७९ने वाढली आहे. ठाणे रेल्वे पोलिसांसाठी २०२ पदे मंजूर असताना, केवळ १४९ पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात आहेत. अद्यापही ठाणे रेल्वे पोलिसांना ५३ पोलिसांची प्रतीक्षा आहे.
पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकात रोज सरासरी ९६ हजार प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांसाठी १५० पोलीस पदे मंजूर असताना, सद्यस्थितीत केवळ ११४ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. दुसरीकडे नायगाव (२.४२ लाख प्रवासी), नालासोपारा (२.१७ लाख प्रवासी) येथील प्रवासी संख्या वाढली आहे. २०१३-१४ साली नायगाव
येथील प्रवासी संख्या रोज ४० हजार होती, तर नालासोपारा येथून १ लाख ९२ हजार प्रवासी रोज प्रवास करत होते. मात्र, या तुलनेत पोलीस कमी असल्याने लाखो प्रवाशांची सुरक्षा केवळ शेकडो पोलिसांच्या खांद्यावर आहे. (उत्तरार्ध)

दोनशे पदे रिक्त
लोहमार्ग आयुक्तालयासाठी ३ हजार ७८० पोलीस अधिकारी-कर्मचाºयांची पदे मंजूर आहे. मात्र, केवळ ३ हजार ५८० पदे भरलेली आहे. ६ सहायक पोलीस उपनिरीक्षकासह १७१ शिपाई आणि अन्य कर्मचारी अशी एकूण २०० पदे रिक्त आहेत.


स्थानक मंजूर पदे कार्यरत रिक्त प्रवासी संख्या
असलेली पदे पदे (लाखांमध्ये)
सीएसएमटी ३५० २६९ ८१ १.५४
दादर २४७ २११ ३६ ०.७६
कुर्ला २७५ २५२ २३ १.६०
ठाणे- २०२ १४९ ५३ २.६७
डोंबिवली ८१ १४ १३ २.५४
कल्याण २६३ १९५ ६८ २.१७
चर्चगेट १५० ११४ ३६ ०.९६
वांद्रे २२४ १७१ ५३ १.४२
वसई रोड १५३ १४६ ०७ १.३६

Web Title: Lakhs of migrants; Only hundreds of police for safety!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.