अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 04:36 AM2024-05-03T04:36:17+5:302024-05-03T04:37:03+5:30

अमोल कीर्तिकर यांच्याकडे एकूण ११ कोटी ७७ लाख रुपयांची मालमत्ता असून, त्यापैकी दोन कोटी ४४ लाखांची जंगम, तर नऊ कोटी ३३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

lok sabha election 2024 Amol Kirtikar's assets increase by nine crores | अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील उद्धवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी त्यांच्याकडील मालमत्तेचा तपशील जाहीर केला. अमोल कीर्तिकर ११ कोटी रुपये मूल्याच्या मालमत्तेचे धनी असून, त्यांच्याकडे ५३ एकर शेतजमीन आहे.

अमोल कीर्तिकर यांच्याकडे एकूण ११ कोटी ७७ लाख रुपयांची मालमत्ता असून, त्यापैकी दोन कोटी ४४ लाखांची जंगम, तर नऊ कोटी ३३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. २०१४ मध्ये कीर्तिकर यांच्याकडे दोन कोटी ७८ लाख रुपये मूल्याची संपत्ती होती.

 कीर्तिकर दाम्पत्याकडे ७५ तोळे सोन्याचे दागिने, बँकेतील ठेवी, वित्तीय संस्थामधील गुंतवणुकीचा समावेश आहे. तसेच त्यांच्याकडे २० लाखांची टोयोटा गाडी आहे.

 रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात एक कोटी ९८ लाख रुपये किमतीची ५३ एकर शेतजमीन. मुंबईत पहाडी गोरेगाव येथे ६८२ चौरस मीटर जागा असून त्याची किंमत एक कोटी ९० लाख आहे.

 दिंडोशी, गोरेगाव आदी ठिकाणी कोट्यवधी रुपये किमतीच्या निवासी आणि व्यापारी जागा असून वारसा हक्काने दोन कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता मिळालेली आहे.

अमोल कीर्तिकर यांच्याकडील संपत्तीचा

तपशील असा...

 जंगम मालमत्ता : २,४४,००,०००

 स्थावर मालमत्ता : ९,३३,३२,०५८

 कर्ज : १,५५,१९,५२६

 सोने : ३९,९२,८००

 रोख रक्कम : ४,३६,५८० रु.

 बँकेतील ठेवी : २,८९,७४२

पत्नी सुप्रिया कीर्तिकर यांची मालमत्ता

 चल संपत्ती : १०,३६,१५३

 अचल संपत्ती : शून्य

 बँकेतील ठेवी : २.६९,६१८

 सोने : ७,६६,५३५

Web Title: lok sabha election 2024 Amol Kirtikar's assets increase by nine crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.