बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे गणेशपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 01:33 PM2019-01-23T13:33:15+5:302019-01-23T13:56:31+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर निवास येथे उभारण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाचे गणेशपूजन करण्यात आले आहे.
मुंबई - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर निवास येथे उभारण्यात येणार आहे. बुधवारी (23 जानेवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाचे गणेशपूजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार पूनम महाजन, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दादरमधील महापौर बंगल्यात स्मारक उभारण्यासाठी 100 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (22 जानेवारी) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर स्मारक उभारणीसाठी मुंबई पालिकेकडून स्मारक संस्थेला महापौर बंगल्याची जागा भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. त्याची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी बाळासाहेबांच्या जयंती दिनी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली.
आज मुंबई येथील महापौर निवास येथे उभारल्या जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकाचे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि पत्नी सौ. रश्मी ताई, मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. pic.twitter.com/uhtz7dZEg6
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) January 23, 2019
स्मारक उभारणीचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून केले जाईल. तेच निविदा काढतील. आधी एमएमआरडीएच स्मारकासाठी 100 कोटी रुपये खर्च करेल आणि नंतर राज्य शासन या खर्चाची प्रतिपूर्ती करेल. या स्मारकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल आधीच तयार करण्यात आला असल्याची माहिती उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी मंगळवारी दिली होती.