एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर साजरा होणार "मराठी भाषा गौरव दिन"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 05:07 PM2019-02-26T17:07:55+5:302019-02-26T17:08:04+5:30

गेली चार वर्षे एसटी महामंडळाच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी "मराठी भाषा गौरव दिन" मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

"Marathi language gaurav day" will be celebrated at every bus station of ST | एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर साजरा होणार "मराठी भाषा गौरव दिन"

एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर साजरा होणार "मराठी भाषा गौरव दिन"

Next

मुंबई : मा. परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून गेली चार वर्षे एसटी महामंडळाच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी "मराठी भाषा गौरव दिन" मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाही एसटीच्या सर्व ५६८ बसस्थानकावर ७० लाख प्रवाशांच्या साक्षीने एसटी कर्मचारी "मराठी भाषा गौरव दिन" साजरा करून मराठी भाषेच्या संवर्धनाचा जागर करणार आहेत.

एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर ठीक ११ वाजता स्थानिक पातळीवरील ज्येष्ठ पत्रकार/मराठीचे प्राध्यापक यांच्या हस्ते एसटी कर्मचारी व प्रवाशांच्या उपस्थितीत कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन,' त्यांना अभिवादन केले जाणार आहे. ज्ञानोबा-तुकोबांची माय-माउली असलेली आपली मराठी भाषा, त्यांच्या अभंग आणि ओव्यांनी अधिक समृद्ध झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक, कवी, नाटककार, कलावंत, प्राध्यापक, पत्रकार, यांनी आपला सिद्धहस्त लेखणी व वाणीतून या माय मराठीला सातासमुद्रापार नेले आहे.

आज इंग्रजाळलेल्या मराठीजनांना आपल्या भाषेचा अभिमान बाळगून तिला वृद्धिंगत करण्याचा जागर एसटीच्या माध्यामातून  केला जात आहे. या प्रसंगी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी  मराठी भाषीक लोकांनी आपली संक्षिप्त नावे इंग्रजी अद्याक्षराद्वारे न लिहिता, सुस्पष्ट मराठी अद्याक्षरांचा वापर करून लिहावीत, अशा विनंती वजा संदेश सर्व मराठी जणांना एसटीच्या वतीने दिला जाणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर स्वच्छता राखून सडा-रांगोळी, फुले, तोरण बांधून, आकर्षक कमानी सजवून सर्व प्रवाशी व कर्मचारी बांधवांना "मराठी भाषा गौरव दिनाच्या" शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. आपली संक्षिप्त नावे इंग्रजी अक्षराद्वारे न लिहिता सुस्पष्ट मराठी अक्षरांचा वापर करून लिहावीत, अशा विनंती संदेश सर्व मराठी जणांना एसटीच्यावतीने दिला जाणार आहे. 

Web Title: "Marathi language gaurav day" will be celebrated at every bus station of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.