मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 06:12 AM2019-10-12T06:12:58+5:302019-10-12T06:15:01+5:30
मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान कल्याण दिशेकडील जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड या दरम्यान कल्याण दिशेकडील जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे राम मंदिर स्थानकावर लोकल थांबविण्यात येणार नाही.
मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान कल्याण दिशेकडील जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. रविवारी सकाळी ९.५३ ते दुपारी २.४२ पर्यंत सीएसएमटीहून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या जलद लोकल सायन ते मुलुंड दरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. त्या सर्व स्थानकांवर थांबतील.
पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येईल. सकाळी १०.३५ पासून ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाºया धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात दोन्ही दिशेकडील लोकल सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून धावतील. मात्र, विलेपार्ले स्थानकाची लांबी कमी असल्याने लोकल दोनदा थांबा घेईल, तर राम मंदिर स्थानकावर फलाट नसल्याने येथे लोकल थांबविण्यात येणार नाही. त्यामुळे राम मंदिर स्थानकावरील प्रवाशांची गैरसोय होईल.
हार्बरवर विशेष लोकल
हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते वाशी दोन्ही दिशेकडे जाणाºया लोकल रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत रद्द करण्यात येतील. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.१६ पर्यंत सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/ पनवेल दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. ब्लॉक काळात सकाळी १०.१७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/ वाशीहून सीएसएमटी दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-वाशी-पनवेल अशा विशेष लोकल चालविण्यात येतील.