चमत्कार! 12 तासाची शस्त्रक्रिया, सहा हार्ट अटॅकनंतरही बचावली चिमुकली

By admin | Published: May 11, 2017 10:27 AM2017-05-11T10:27:55+5:302017-05-11T10:27:55+5:30

शरीराला एखादा दुर्धर आजार जडल्यानंतर त्यातून पूर्णपणे बरी होणारी व्यक्ती इतरांसाठी एक चमत्कार असतो.

Miracle! Six-hour surgery, a six-hearted escape survivor, still lives in Chimukula | चमत्कार! 12 तासाची शस्त्रक्रिया, सहा हार्ट अटॅकनंतरही बचावली चिमुकली

चमत्कार! 12 तासाची शस्त्रक्रिया, सहा हार्ट अटॅकनंतरही बचावली चिमुकली

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 11 - शरीराला एखादा दुर्धर आजार जडल्यानंतर त्यातून पूर्णपणे बरी होणारी व्यक्ती इतरांसाठी एक चमत्कार असतो. डॉक्टरांची मेहनत आणि रुग्णाच्या इच्छाशक्तीमुळे काहीवेळा असे चमत्कार घडतात. परेल येथील लहान मुलांच्या बी.जे.वाडिया रुग्णालयातही अशीच एक घटना समोर आली आहे. बारा तासांची ह्दयशस्त्रक्रिया आणि त्यानंतर ह्दयविकाराचे सहा झटके येऊनही एक चार महिन्यांची मुलगी सुखरुप आहे. 
 
विदिशा वाघमारे असे या मुलीचे नाव असून, मागच्या दोन महिन्यांपासून तिच्यावर वाडिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ह्दयविकाराच्या गंभीर आजारातून या मुलीचे बचावणे चमत्कारापेक्षा कमी नाही. येत्या एक-दोन दिवसात या मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. विदिशा कल्याणला राहते. विदिशा 45 दिवसांची असताना आई तिला भरवत होती. त्यावेळी अचानक तीला उलटी झाली आणि ती बेशुद्ध झाली. वदिशाचे आई-वडिल तिला लगेचच जवळच्या नर्सिंग होममध्ये घेऊन गेले. तिथल्या डॉक्टारांनी तिला परेलच्या वाडिया रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. 
 
वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी विदिशाला ह्दयविकार असल्याचे निदान केले. विदिशाला जो आजार होता त्यामध्ये तिच्या ह्दयाची रचना सामन्या ह्दयापेक्षा पूर्णपणे भिन्न होती. 14 मार्चला वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी विदिशावर शस्त्रक्रिया करुन तिच्या ह्दयाची क्षमता वाढवली. विदिशाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सातत्याने कमी व्हायचे तर, कार्बनड डायऑक्साईडचे प्रमाण तीन पटीने वाढायचे. 
 
शस्त्रक्रियेनंतर 51 दिवस ती आयसीयूमध्ये होती. शरीरातील असमतोलामुळे शस्त्रक्रियेनंतर सहावेळा तिला ह्दयविकाराचा झटका आला. पण त्यातूनही विदिशा बचावली. रुग्णालयाने विदिशाच्या फुप्फुसांना स्थिर करण्यासाठी विशेष प्रकारचा व्हेंटिलेटर वापरला. ह्दयविकाराचा आम्ही पाहिलेला हा अत्यंत दुर्मिळ प्रकार आहे असे विदिशावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले. विदिशाचे आई-वडिल विशाखा आणि विनोद वाघमारे यांना तिच्या उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता. विदिशाच्या उपाचरावर पाच लाख रुपये खर्च आला. त्यांनी कसेबसे 25 हजार रुपये उभे केले. बाकीचा खर्च रुग्णालयाच्या देणगीदारांनी उचलला. 

Web Title: Miracle! Six-hour surgery, a six-hearted escape survivor, still lives in Chimukula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.