ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरता दवाखाना, ‘क्लिक आॅन व्हील्स’चा नवा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 03:52 AM2017-08-28T03:52:07+5:302017-08-28T03:53:05+5:30
मुलुंड येथील खासगी रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि कर्मचारी यांनी मुलुंडमधील वामनराव मुंजारन विद्यालयाच्या आवारात नुकताच ‘क्लिनिक आॅन व्हील्स’ सेवेचा शुभारंभ केला.
मुंबई : मुलुंड येथील खासगी रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि कर्मचारी यांनी मुलुंडमधील वामनराव मुंजारन विद्यालयाच्या आवारात नुकताच ‘क्लिनिक आॅन व्हील्स’ सेवेचा शुभारंभ केला. ‘क्लिनिक आॅन व्हील्स’च्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत बाह्यरुग्ण सेवा तसेच वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे. आठवड्याचे सहा दिवस सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे फिरते क्लिनिक बोलावल्यास्थळी हजर होईल.
या क्लिनिकद्वारे पुरविल्या जाणाºया सुविधांमध्ये ईसीजी तपासणी, रक्त आणि साखरेची सर्वसाधारण तपासणी, रक्तदाब तपासणी यांचा समावेश आहे. प्रशिक्षित वृद्धोपचारतज्ज्ञ आणि परिचारक यांच्याद्वारे चालविल्या जाणाºया या फिरत्या दवाखान्यात आणीबाणीच्या वेळी अत्यंत गरजेच्या ठरणाºया आॅक्सिजनचा पुरवठाही उपलब्ध असेल. याखेरीज विशेष गरजा असलेल्या रुग्णांसाठी व्हीलचेअरही उपलब्ध असेल. हा उपक्रम मुलुंड येथील तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारचे सामाजिक न्याय आणि सबलीकरणमंत्री थावर चंद गेहलोत या कार्यक्रमाचे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी, युवा प्रतिष्ठानच्या महासचिव डॉ. मेधा सोमय्या, डॉ. एस. नारायणी व डॉ. हिरेन आंबेगावकर हेसुद्धा उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल बोलताना डॉ. श्रीनिवास ठाकूर म्हणाले, व्यापक अर्थाने एक समाज म्हणून आपल्या ज्येष्ठांच्या स्वास्थ्याप्रति जबाबदारी आपण पार पाडणे हे महत्त्वाचे
आहे. घरच्या घरी आरोग्य सेवेची
गरज असलेल्या ज्येष्ठांपर्यंत पोहोचण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. प्रशिक्षित टीम अशा ज्येष्ठांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सक्षम आहे व ही टीम या भागातील ज्येष्ठ नागरिकांना शक्य तितकी उत्तम आरोग्य सेवा पुरवेल. डॉ. एस. नारायणी म्हणाल्या की, या सेवेमुळे समाजातील मित्रांना घरच्या घरी आरोग्य सेवेचा लाभ
घेता येईल.
या मोफत सेवेद्वारे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आम्हाला पोहोचता येईल. ‘क्लिनिक आॅन व्हील्स’ ही सेवा आपल्या दाराशी बोलावण्यासाठी ९१६७००११२२ या क्रमांकावर संपर्क साधून वेळ निश्चित करता येईल.