मोदी सरकारची उज्ज्वला योजनासुद्धा फसवीच, राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:23 AM2018-02-13T01:23:27+5:302018-02-13T01:24:12+5:30

भाजपा सरकारकडून ‘उज्ज्वला गॅस योजनेचा’ मोठा गाजावाजा केला जात आहे. ही योजना कागदावर चांगली असली तरी त्याची अंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे. एकीकडे या योजनेत सहभागी झाल्यामुळे गरिबांचे राशनवर मिळणारे हक्काचे रॉकेल बंद झाले आहे तर दुसरीकडे गॅसचे दरही परवडत नाहीत.

Modi government's bright plan is also fraudulent, NCP's criticism | मोदी सरकारची उज्ज्वला योजनासुद्धा फसवीच, राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मोदी सरकारची उज्ज्वला योजनासुद्धा फसवीच, राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

Next

मुंबई : भाजपा सरकारकडून ‘उज्ज्वला गॅस योजनेचा’ मोठा गाजावाजा केला जात आहे. ही योजना कागदावर चांगली असली तरी त्याची अंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे. एकीकडे या योजनेत सहभागी झाल्यामुळे गरिबांचे राशनवर मिळणारे हक्काचे रॉकेल बंद झाले आहे तर दुसरीकडे गॅसचे दरही परवडत नाहीत. त्यामुळे अनेक महिला पुन्हा चुलीकडे वळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.
सोमवारी, राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी उज्ज्वला गॅस योजनेबाबत चित्रफीत दाखविली. या योजनेचे वास्तव मांडण्यासाठी राष्ट्रवादीने राज्याच्या ६ जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधला असून त्या महिलांचे दु:ख चित्रफितीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचे वाघ यांनी सांगितले. या योजनेचा लाभ घेणाºयांना सुरुवातीला पैसे घेऊनच ‘गॅस कनेक्शन’ दिले जाते. दुर्गम भागात गॅस कनेक्शन घेणाºयांना तो पोहचण्यासाठीच दीडशे ते दोनशे रुपये द्यावे लागतात. साडे आठशे ते नऊशे रुपयाला पडणारा सिलेंडर
दीड ते दोन महिने साधारणत: पुरतो. परंतु या गोरगरिबांना इतके पैसे
देणे शक्य नसल्याने गॅस कनेक्शन असूनही त्याचा वापर करणे शक्य नसलयचे काही लाभार्थ्यांनी सांगितल्याचे वाघ म्हणाल्या. तसेच हे कनेक्शन घेणा-या लाभार्थ्यांचे रॉकेल बंद केल्यामुळे सरपण आणि प्लॅस्टिक जाळत आहेत. त्यामुळे या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे, असेही वाघ यांनी सांगितले.

जनतेची घुसमट
सरकारच्या इतर योजनांसारखीच ही योजनाही फसवी असून सरकारच्या फसव्या घोषणांच्या धुरामध्ये जनतेची घुसमट होत आहे.
या फसव्या योजनेविरोधात राष्ट्रवादी प्रत्येक जिल्ह्यता आंदोलन छेडणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.
शहरी आणि ग्रामीण भागातील सामान्य जनतेला सिलेंडरची किंमत परवडणारी नाही. त्यामुळे या सिलेंडरची किंमत कमी करण्याची मागणीही यावेळी वाघ यांनी केली.

Web Title: Modi government's bright plan is also fraudulent, NCP's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.