Mumbai Bandh: ठाण्यात 'रेल रोको', शेकडो मराठा आंदोलक ट्रॅकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 10:29 AM2018-07-25T10:29:05+5:302018-07-25T10:48:41+5:30
Mumbai Bandh: 'मुंबई बंद' शांततापूर्ण मार्गाने करण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केलं असलं तरी, त्यांच्या आचारसंहितेचा भंग होत असल्याचं चित्र मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पाहायला मिळतंय.
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला हिंसक वळण लागलं होतं. त्याची दखल घेऊन, आजचा 'मुंबई बंद' शांततापूर्ण मार्गाने करण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केलं असलं तरी, त्यांच्या आचारसंहितेचा भंग होत असल्याचं चित्र मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पाहायला मिळतंय.
ठाणे स्टेशनात सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मराठा आंदोलकांनी वेगवेगळ्या ट्रॅकवर उतरून अप-डाउन लोकल अडवल्या. आधी कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलपुढे शेकडो कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस त्यांची समजूत काढून त्यांना ट्रॅकवरून हटवण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी, दुसऱ्या बाजूला सीएसटीएमकडे निघालेल्या लोकलपुढे आंदोलकांच्या एका जमावाने ठाण मांडलं. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मुंबई बंदचा फटका बसला आहे.
याआधी, पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर साडेनऊच्या सुमारास जोगेश्वरी स्टेशनात काही मराठा आंदोलकांनी ट्रॅकवर उतरून लोकल अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी काही मिनिटांतच त्यांना हटवल्यानं लोकल सेवा सुरळीत सुरू आहे.
?utm_source=WhatsApp&utm_medium=Social
#MarathaReservation protests: Workers of #MarathaKrantiMorcha block a local train in Thane pic.twitter.com/cotagpKpzp
— ANI (@ANI) July 25, 2018
ठाण्यात, तीन हात नाका, नौपाडा भागात आंदोलन करून मराठा कार्यकर्ते रेल्वे स्टेशनात पोहोचले. त्यातील अर्धे आंदोलक मुंबई एन्डला, तर उर्वरित कल्याण एन्डला गेले आणि ट्रॅकवर उतरले. सर्वच प्लॅटफॉर्मवर नोकरदारांची गर्दी आहे. 'रेल रोको' करून चाकरमान्यांची गैरसोय न करण्याचं आवाहन पोलीस आंदोलकांना करताहेत, पण ते हटायला तयार नाहीत.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. शाळा, स्कूल बस, दुधाचे टँकर, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने यासारख्या अत्यावश्यक सेवांना त्यांनी या बंदमधून वगळलंय. तसंच, कार्यकर्त्यांना शांततेने आंदोलन करण्याच्या सूचनाही दिल्यात. परंतु, मुंबई बंद यशस्वी करून दाखवण्यासाठी आंदोलकांनी दगड उचलल्याचं आणि रेल्वे अडवल्याचं पाहायला मिळतंय.
#MarathaReservation protest: A Thane Municipal Transport(TMT) bus vandalised in Wagle estate area of Thane. #Maharashtrapic.twitter.com/IzMutlrp4l
— ANI (@ANI) July 25, 2018
#MarathaReservation protests: Tires set ablaze on Majiwada bridge in Thane. #Maharashtrapic.twitter.com/2sTPFB1zRo
— ANI (@ANI) July 25, 2018