Mumbai Dongri Building Collapsed: 'राज्य सरकार जबाबदार अन् मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 03:11 PM2019-07-16T15:11:56+5:302019-07-16T15:16:32+5:30
'पुनर्विकासाच्या इमारतींबाबत सरकारचे धोरण हे उदासीन आहे'
मुंबई : मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या कौसरबाग इमारतीचा निम्मा भाग कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. यामध्ये 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर त्यांनी या दुर्घटनेचा सरकारच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "डोंगरी भागातील दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत पुनर्विकास यादीत होती मात्र त्यावर निर्णय घेतला गेला नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात इमारत पुनर्विकासाबाबतची एक बैठकही घेतली नाही. पुनर्विकासाच्या इमारतींबाबत सरकारचे धोरण हे उदासीन आहे. पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी किती बैठका घेतल्या? राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळेच अशा इमारत दुर्घटना होत आहेत. राज्य सरकारचे पुनर्विकासाचे उदासीन धोरण, म्हाडा आणि मुंबई महापालिका दुर्घटनेला जबाबदार आहे."
मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी आहेत. डोंगरी भागातली कौसरबाग ही इमारत धोकादायक असल्याची तक्रार वारंवार केली गेली मात्र भसम्या झाल्यागत भ्रष्टाचारी महानगरपालिकेला पैसे गिळण्याशिवाय वेळ मिळाला तर ते लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देईल ना! pic.twitter.com/B2M6xXgQSV
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 16, 2019
याशिवाय, धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुनही मुंबई महापालिकेला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, "मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी आहेत. डोंगरी भागातली कौसरबाग ही इमारत धोकादायक असल्याची तक्रार वारंवार केली गेली मात्र भसम्या झाल्यागत भ्रष्टाचारी महानगरपालिकेला पैसे गिळण्याशिवाय वेळ मिळाला तर ते लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देईल ना!"
डोंगरी भागातील दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत पुनर्विकास यादीत होती मात्र त्यावर निर्णय घेतला गेला नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात इमारत पुनर्विकासाबाबतची एक बैठकही घेतली नाही. #dongri#MumbaiBuildingCollapsepic.twitter.com/47TOxl49bb
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 16, 2019
दरम्यान, आज सकाळी कौसरबाग या चार मजली इमारतीचा निम्मा भाग कोसळला. ही घटना दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी ही दुर्घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारत कोसळल्याने या भागात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. तसेच, घटनास्थळी एनडीआरएफ, पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान दाखल झाले असून मदतकार्याला सुरुवात झाली आहे.
Mumbai: A child rescued from the building collapse site in Dongri, he has been admitted to hospital and is stable pic.twitter.com/LawktNSdR7
— ANI (@ANI) July 16, 2019
इमारत 100 वर्षे जुनी, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
कौसरबाग इमारत 100 वर्षे जुनी होती. म्हाडाच्या अखत्यारीत येणारी ही इमारत पुनर्विकासासाठी विकासकाला दिली होती. मात्र, या विकासकाने पुर्नविकासाचे काम वेळात सुरू केले होते की नाही, याची चौकशी केली जाईल. तसेच, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या इमारतीत 15 कुटुंब राहत असल्याची माहिती आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Maharashtra CM Devendra Fadnavis on Dongri building collapse: As per the initial information I have received, around 15 families are feared trapped in the collapse. The building is around 100 yrs old. The entire focus is on rescuing the people trapped. Investigation will be done. pic.twitter.com/ApIVqmNLMb
— ANI (@ANI) July 16, 2019