Mumbai Rain Live Updates: मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस; तिन्ही रेल्वे मार्गांवरील वाहतुकीला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 07:48 AM2018-07-09T07:48:10+5:302018-07-09T13:42:32+5:30

मुंबईसह ठाण्यात दमदार पाऊस

Mumbai Rain Live Updates heavy rain in mumbai thane kalyan dombivali Heavy rain forecast in next 24 hours | Mumbai Rain Live Updates: मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस; तिन्ही रेल्वे मार्गांवरील वाहतुकीला फटका

Mumbai Rain Live Updates: मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस; तिन्ही रेल्वे मार्गांवरील वाहतुकीला फटका

Next

मुंबई: संपूर्ण मुंबईत रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. तर कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या भागात रात्रभर पावसानं धुमशान घातलं आहे. येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. 

सध्या मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे. माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये पावसाची रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र पश्चिम रेल्वेची सेवा सुरळीत आहे. मुलुंड, घाटकोपरमध्येही रिमझिम पाऊस आहे. मात्र ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 24 तासांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

Live Updates: 

- मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर


- खोपोलीत झाडं कोसळलं; वाहतुकीचा खोळंबा

- सँडहर्स्ट स्थानकावरील धीम्या मार्गावर भिंत कोसळली

- वसई- विरार परिसरात जोरदार पाऊस, रात्रभर पावसाची संततधार, सनसिटी गास रोड पूर्ण पाण्याखाली

- वसईत जोरदार पाऊस; मिठागरात 400 जण अडकले
- ठाण्यात रात्रभर कोसळधार; सकाळीदेखील पावसाचा जोर कायम
- डोंबिवलीत सकाळी मुसळधार पाऊस; सलग दोन तास पावसाची जोरदार बॅटिंग
- अंबरनाथमध्ये तुफान पाऊस 
- ऐरोली, कामोठेमध्ये जोरदार पाऊस
- वसई, विरार, नालासोपाऱ्यात पावसाच्या सरी
- मध्य, पश्चिम, हार्बरवरील वाहतूक धीम्या गतीनं


- उल्हासनगरात जोरदार पाऊस, वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
- नवी मुंबईत पनवेलमध्ये मुसळधार पाऊस


- तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं
- सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रेल्वे वाहतुकीवरही परिणाम
- वसई-विरारमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस; सखल भागांमध्ये पाणी साचलं
- पावसामुळे डहाणूहून विरारकडे जाणारी उपनगरीय रेल्वे वाहतूक ठप्प
- इंदुर-मुंबई दुरान्तो एक्स्प्रेस भिलाड स्टेशनमध्ये थांबवली. पुढील सूचना मिळेपर्यंत एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना होणार नाहीत; रेल्वे प्रशासनाची माहिती
- पावसाच्या संतत धारेने शहरातील तिनबत्ती, तानाजीनगर, शिवाजीनगर मार्केटमध्ये पाणी साचलं

Web Title: Mumbai Rain Live Updates heavy rain in mumbai thane kalyan dombivali Heavy rain forecast in next 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.