महापालिकेचा दांडपट्टा सुरूच, अधिका-यांच्या सुट्ट्या रद्द, रविवारी आणखी ३५७ हॉटेल्सवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 06:46 AM2018-01-01T06:46:43+5:302018-01-01T11:27:06+5:30

लोअर परळच्या कमला मिल कंपाउंडमधील आगीत १४ निष्पापांचे बळी गेल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेले मुंबई महापालिका प्रशासन जागे झाले. मनपा आयुक्त अजय मेहता यांनी साहाय्यक मनपा आयुक्तांसह वॉर्डमधील अधिकाºयांच्या सुट्ट्या रद्द केल्याने रविवारी मुंबईच्या विविध वॉर्डमध्ये एकूण ३५७ हॉटेल्स व बारवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४२६ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

 Municipal corporation's dash begins, officials canceled on leave, more 357 hotels on Sunday | महापालिकेचा दांडपट्टा सुरूच, अधिका-यांच्या सुट्ट्या रद्द, रविवारी आणखी ३५७ हॉटेल्सवर कारवाई

महापालिकेचा दांडपट्टा सुरूच, अधिका-यांच्या सुट्ट्या रद्द, रविवारी आणखी ३५७ हॉटेल्सवर कारवाई

Next

मुंबई : लोअर परळच्या कमला मिल कंपाउंडमधील आगीत १४ निष्पापांचे बळी गेल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेले मुंबई महापालिका प्रशासन जागे झाले. मनपा आयुक्त अजय मेहता यांनी साहाय्यक मनपा आयुक्तांसह वॉर्डमधील अधिकाºयांच्या सुट्ट्या रद्द केल्याने रविवारी मुंबईच्या विविध वॉर्डमध्ये एकूण ३५७ हॉटेल्स व बारवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४२६ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या विविध भागांतील एकूण ६१६ बार व रेस्टॉरंटची रविवारी झाडाझडती घेण्यात आली. त्यात दोषी आढळलेल्या ३५७ बार व रेस्टॉरंटवर पालिकेने धडक कारवाई करताना ३० हॉटेलना टाळे ठोकणे आणि तोडक कारवाई केली आहे. यामध्ये एल वॉर्डमधील २२, आर नॉर्थ व एस वॉर्डमध्ये प्रत्येकी तीन आणि डी व एम वॉर्डमध्ये प्रत्येकी एका हॉटेलचा समावेश आहे. अन्य ठिकाणच्या कारवाईत हॉटेल्सनी केलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.
हॉटेल आणि रेस्टॉरंटवरील धडक कारवाईसाठी मनुष्यबळ कमी पडू नये, म्हणून मनपा आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांसह सर्वच वॉर्डमधील अधिकाºयांच्या सुट्ट्या रद्द केल्या. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कमला मिल, रघुवंशी मिल आणि पेनिन्सुला बिझनेस पार्क येथील हॉटेल बार, पबवरील कारवाई रविवारीही सुरू होती. महापालिकेचे वॉर्डमधील अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त प्रत्येक कारवाईवेळी स्वत: हजर असल्याचे रविवारी दिसले.

अटकपूर्व जामिनासाठी धावपळ

कमला मिल कम्पाउंडमधील भीषण अग्नितांडवाला ९६ तासांचा अवधी उलटूनही, पबच्या फरार मालकांचा शोध पोलिसांना अद्याप घेता आलेला नाही.
उलट भक्कम राजकीय वरदहस्त व निवृत्त सनदी अधिकाºयांचे निकटचे नातेवाईक असलेल्या या आरोपींना अटकपूर्व जामीन अर्ज मिळावा, यासाठी अप्रत्यक्षपणे सहकार्य केले जात आहे.
त्यासाठी एक यंत्रणाच कामाला लागली असून, सोमवारी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

संघवीच्या दोघा चुलत्यांना अटक व जामीन
‘वन अबव्ह’चे संचालक असलेला जिगर संघवी व क्रिपेश संघवी यांना पलायन करण्यास सहकार्य केल्याबद्दल, त्याचे चुलते आदित्य महेंद्रमल संघवी (वय २९) व राकेश गणेशमल संघवी (४५) याला रविवारी भायखळा पोलिसांनी अटक केली. त्याच वेळी वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला. -वृत्त/३

Web Title:  Municipal corporation's dash begins, officials canceled on leave, more 357 hotels on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.