नंबर दोनच्या मंत्र्यांमुळे माझा भाजपा प्रवेश रखडला; नारायण राणेंचा रोख चंद्रकांत पाटलांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:30 PM2019-05-08T13:30:52+5:302019-05-08T13:31:03+5:30

नारायण राणेंनी आत्मचरित्र लिहिल्यापासून त्याची मीडियात चर्चा आहे.

My bjp's entry Stuck due to the CHANDRAKANT PATIL BY Narayan Rane | नंबर दोनच्या मंत्र्यांमुळे माझा भाजपा प्रवेश रखडला; नारायण राणेंचा रोख चंद्रकांत पाटलांवर

नंबर दोनच्या मंत्र्यांमुळे माझा भाजपा प्रवेश रखडला; नारायण राणेंचा रोख चंद्रकांत पाटलांवर

Next

मुंबईः नारायण राणेंनी आत्मचरित्र लिहिल्यापासून त्याची मीडियात चर्चा आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी आत्मचरित्रातून खळबळजनक खुलासे केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं यासंदर्भात वृत्त दिले आहेत. आत्मचरित्रात राणे लिहितात, चंद्रशेखर बावनकुळेंनी मुलीच्या लग्नाचं निमंत्रण मला दिलं होतं. तेव्हा त्या लग्नात माझी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. त्यांनीही मला भाजपा प्रवेशाचं आश्वासन दिलं.

मुख्यमंत्र्यांनी मला वर्षा बंगल्यावरती भेटण्यासाठी बोलावलं. नंतर काही दिवस सीएम संपर्कात होते. त्याचदरम्यान माझी नितीन गडकरींशीही चर्चा झाली. मला पक्षात घेतल्यास पाठिंबा काढण्याची शिवसेनेनं धमकी दिली. सेनेच्या धमक्यांमुळे भाजपा नेतृत्व अस्वस्थ झालं आणि माझा पक्ष प्रवेश रखडला. तर दुसरीकडे मुख्यमंत्रीही म्हणाले होते की, नारायण राणेंना योग्य सन्मान दिला जाईल. राणेंना त्यांच्या राजकीय वजनानुसार मंत्रिपद द्यावं लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांना सांगितलं. त्यानंतर नंबर दोनचे नेते चलबिचल झाले. पक्षाच्या भल्यासाठी भाजपात प्रवेश करा, असं सांगणाऱ्या मंत्र्यांना माझा विसर पडला. माझ्या घरी टॅक्सीमधून फेऱ्या मारणारे अचानक गायब झाले. त्या ज्येष्ठ नेत्यांना कळलं माझा प्रवेश झाल्यास त्यांच्याकडची मोठी खाती माझ्याकडे येतील. त्यांना दुसऱ्याचे घर वाचवायला गेल्यास स्वतःचे घर खाली होईल, याची भीती सतावू लागली आणि मला पक्षात घेतलं नाही.


तत्पूर्वी राणेंनी शिवसेना सोडल्यानंतरच्या घटनांचाही या आत्मचरित्रात उल्लेख केला आहे. राणे पक्षात परत आल्यास मी आणि रश्मी ठाकरे घर सोडून जाऊ, अशी धमकी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिल्याचा गौप्यस्फोट राणेंनी आत्मचरित्रातून केला आहे. काही प्रामाणिक शिवसैनिकांकडून मला समजल्याचं राणेंनी सांगितलं आहे. मनोहर जोशींमुळेच शिवसेनेची वाट लागल्याचा उल्लेखही राणेंनी केला आहे. माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडावं लागल्यानं जोशींच्या मनात एक प्रकारचा राग होता. वरकरणी जरी जोशी शिवसेनेचे चिंतक असल्याचे वाटत असले तरी त्यांच्या निर्णयामुळे पक्षाची आज अशी परिस्थिती झाली आहे. जोशी उद्धवजींच्या जवळचे होऊ लागले होते. पद्धतशीरपणे त्यांनी विरोधी नेत्यासाठी सुभाष देसाईंचं नाव पुढे केलं.  

Web Title: My bjp's entry Stuck due to the CHANDRAKANT PATIL BY Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.