‘रविकिरण’च्या बालनाट्य स्पर्धेत ‘नभी उतरे इंद्रधनू’ सर्वोत्कृष्ट!
By admin | Published: December 24, 2016 03:37 AM2016-12-24T03:37:11+5:302016-12-24T03:37:11+5:30
कामगार विभागात गेली ५८ वर्षें सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या रविकिरण संस्थेतर्फे नुकतीच
मुंबई : कामगार विभागात गेली ५८ वर्षें सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या रविकिरण संस्थेतर्फे नुकतीच ३२वी सुलभाताई देशपांडे यांच्या स्मरणार्थ बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत डोंबिवली येथील रवींद्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या ‘नभी उमटे इंद्र धनु’ या नाट्यास प्रथम, महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन यांच्या ‘कस्तुरी’स द्वितीय तर कल्याणच्या सेक्रेट हार्ट स्कूलच्या ‘अ ते ज्ञ’ या बालनाट्यास तृतीय पारितोषिक मिळाले.
उत्तेजनार्थ म्हणून डोंबिवलीच्या सुयश नाट्य संस्थेच्या ‘गोष्ट जंगलाची’, पुणे येथील आकांक्षा बाल रंगभूमीच्या ‘बफरिंग’ या बालनाट्यास गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संवाद लेखक, सिनेनाट्य कलाकार प्रल्हाद कुडतरकर व विशेष अतिथी म्हणून सुलभातार्इंचे ज्येष्ठ सुपुत्र निनाद देशपांडे उपस्थित होते. या वेळी डोंबिवली येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या माजी शिक्षिका भाग्यलक्ष्मी पडसलगीकर यांचा निनाद देशपांडे व प्रल्हाद कुडतरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.