अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आता नवे हेलिकॉप्टर! राज्य सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 05:52 AM2018-05-09T05:52:01+5:302018-05-09T05:52:01+5:30

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी १२७ कोटी ११ लाख रुपये किमतीचे आणि नक्षलविरोधी अभियानासाठी ७२.४३ कोटींचे नवे हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने मंगळवारी शिक्कामोर्तब केले.

New helicopter now for VIPs! State Government Decision | अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आता नवे हेलिकॉप्टर! राज्य सरकारचा निर्णय

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आता नवे हेलिकॉप्टर! राज्य सरकारचा निर्णय

Next

- विशेष प्रतिनिधी  
मुंबई - अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी १२७ कोटी ११ लाख रुपये किमतीचे आणि नक्षलविरोधी अभियानासाठी ७२.४३ कोटींचे नवे हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने मंगळवारी शिक्कामोर्तब केले.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अमेरिकेतील सिर्कोस्की इंटरनॅशनल आॅपरेशन या कंपनीकडून एस ७६-डी हे हेलिकॉप्टर टुल्ससह खरेदी करण्यात येईल. त्याचा खर्च हा १२७ कोटी ११ लाख रुपये इतका असेल. यापैकी आगाऊ म्हणून २० टक्के इतकी रक्कम (२५.४२ कोटी रु.) देण्यात येईल. त्यासाठीची तरतूदही करण्यात आली आहे. उर्वरित ८० टक्के म्हणजे १०१.६९ कोटी रुपये हे हेलिकॉप्टर प्रत्यक्ष घेताना देण्यात येतील. त्यासाठीची रक्कम विधिमंडळाच्या जुलैतील पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे करण्यात येईल.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय ७ सप्टेंबर २०१७ च्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार ७ नोव्हेंबर २०१७ रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शक्ती प्रदत्त समितीने गेल्याच महिन्यात हेलिकॉप्टर खरेदीवर शिक्कामोर्तब केले होते.
जर्मनीतील कंपनीकडून खरेदी
नक्षलविरोधी अभियानासाठीच्या हेलिकॉप्टरची (एच १४५) खरेदी ही मूळ फ्रेंच असलेल्या एअर बस या कंपनीच्या जर्मनीतील डॉईशलँड प्लँटमधून केली जाणार आहे. या हेलिकॉप्टरच्या खरेदीसही ७ सप्टेंबर २०१७ च्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. मुख्य सचिवांच्या समितीने त्यावरही शिक्कामोर्तब केले. या हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी १४.४९ कोटी आगाऊ रक्कम म्हणून देण्यात येईल. हे हेलिकॉप्टर २ पायलट आणि १० प्रवासी क्षमतेचे असेल. ते बहुउद्देशीय हेलिकॉप्टर असेल. त्यात वैद्यकीय उपचाराची साधने (स्ट्रेचरसह) बसविता येतील. नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीचे वाटप करण्यासाठीही त्याचा उपयोग करता येईल.
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियान तसेच त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी, ापत्कालिन परिस्थितीत जखमी कर्मचाºयांची ने-आण करण्यासाठी खरेदी करण्यात येणाºया हेलिकॉप्टरचा वापर वेळप्रसंगी राज्याच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठीही करता येईल.

सध्या आहे एकच विमान
राज्य सरकारच्या सेवेत सध्या स्मॉल एक्झुक्युटीव्ह जेट विमान असून त्याची प्रवासी क्षमता आठ इतकी आहे. अतिहत्त्वाच्या व्यक्ती (मुख्यमंत्री/राज्यपाल) या विमानात असताना एक इंजिनियर आणि एक केबिन क्रू सोबत न्यावा लागतो. त्यामुळे अशावेळी सहाच प्रवाशांना जाता येते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन जाणारे राज्य शासनाच्या मालकीचे हेलिकॉप्टर निलंगा येथे अपघातगरस्त झाले होते. तेव्हापासून ते बंदच आहे.

१४.४९ कोटी रुपये - हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी आगाऊ रक्कम.
२ पायलट आणि १० प्रवासी क्षमतेचे हे हेलिकॉप्टर बहुउद्देशीय असेल.

‘पवनहन्स’ला दरवर्षी २५ कोटी रु.

नक्षलविरोधी अभियानासाठी राज्य शासनाकडून पवनहन्स हेलिकॉप्टर ८ वर्षांपासून भाड्याने घेतले जात होते. त्याचे वार्षिक भाडे जवळपास २५ कोटी रुपये इतके होते. आता या अभियानासाठी हेलिकॉप्टर खरेदी केल्याने हा खर्च वाचणार आहे.

Web Title: New helicopter now for VIPs! State Government Decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.