गुंतवणुकीवरील जादा व्याजाचे आमिष पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 06:08 AM2018-10-22T06:08:15+5:302018-10-22T06:08:17+5:30
गुंतवलेल्या रकमेवर सहा महिन्यांनी दरमहा सहा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत माटुंग्यातील मरिअप्पन मनागवलन मुप्पन (४९ ) यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांना ६२ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला आहे.
Next
मुंबई : गुंतवलेल्या रकमेवर सहा महिन्यांनी दरमहा सहा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत माटुंग्यातील मरिअप्पन मनागवलन मुप्पन (४९ ) यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांना ६२ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.