पॅरोलवरील आरोपीची मंत्रालयात आत्महत्या, उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 06:21 AM2018-02-09T06:21:52+5:302018-02-09T06:22:05+5:30
मेव्हणीच्या खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगणा-या एका इसमाने गुरुवारी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हर्षल रावते (वय ४५) असे या मृत तरुणाचे नाव असून सध्या तो पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता.
मुंबई : मेव्हणीच्या खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगणा-या एका इसमाने गुरुवारी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हर्षल रावते (वय ४५) असे या मृत तरुणाचे नाव असून सध्या तो पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता.
जन्मठेपेची शिक्षा कमी व्हावी, या मागणीसाठी हर्षल रावते मंत्रालयात आला होता. सायंकाळी ६च्या सुमारास त्याने उडी घेतली. पोलिसांनी बेशुद्धावस्थेतील हर्षलला सेंट जॉर्जेस रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हे कळताच शिक्षणमंत्री विनोद तावडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील घटनास्थळी दाखल झाले.
मंत्रालयात महिनाभरात आत्महत्येच्या प्रयत्नाची तिसरी घटना आहे. मेव्हणी सुवर्णा कदम हिच्या हत्येप्रकरणी हर्षलला जन्मठेप झाली होती. पैठण कारागृहात तो शिक्षा भोगत होता व १० जानेवारीपासून २८ दिवसांच्या पॅरोलवर होता. पॅरोलचा आज (गुरुवार) शेवटचा दिवस होता, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरुंग प्रशासन) भूषणकुमार उपाध्याय म्हणाले.
सुवर्णा कदमची २००३ साली हत्या झाली होती.
>मंत्रालय : सुसाइड पॉइंट
मंत्रालयात येऊनही न्याय मिळत नसल्याने आत्महत्या करण्याची ही वर्षभरातील सहावी घटना आहे. धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या शेतकºयाने आत्महत्या केल्याने महाराष्टÑ हादरला होता. तर २ फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्ह्यातील मारुती धावारे हा २८ वर्षीय तरुण हातात विषाची बाटली घेऊन आला होता.
पोलिसांनी त्याला वेळीच अटकाव केल्याने पुढील अनर्थ टळला. बुधवारी नगर जिल्ह्यातील अविनाश शेटे या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी नांदेड, बीड जिल्ह्यातील युवा शेतकºयांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.