'लाव रे तो व्हिडिओ' आता मुंबईत, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 03:57 PM2019-04-21T15:57:03+5:302019-04-21T15:58:40+5:30

राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे.

permission for mumbai rally of mns chief raj thackeray for Lok Sabha Election | 'लाव रे तो व्हिडिओ' आता मुंबईत, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी

'लाव रे तो व्हिडिओ' आता मुंबईत, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी

Next

मुंबई : लोकसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईत पहिली सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या शहीद भगतसिंग मैदानात राज ठाकरे यांना 24 तारखेऐवजी 23 तारखेला सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

मुंबईत 24 तारखेला राज ठाकरे यांच्या सभेसाठी परवानगी मिळावी, यासाठी मनसेकडून प्रयत्न सुरु होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधीत उमेदवारांना विविध परवानग्यांसाठी 'एक खिडकी योजनें'तर्गत अर्ज करणे आवश्यक असते. त्यानुसार मनसेचा अर्ज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील एक खिडकी योजनेच्या समन्वय अधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, त्यांनी मनसे निवडणूक लढवत नसल्याचे कारण देत सभेला परवानगी नाकारली. परंतु आता राज ठाकरे यांच्या सभेला 24 तारखेऐवजी 23 तारखेला परवानगी देण्यात आली आहे. 

दरम्यान, राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. राज ठाकरे यांनी आतापर्यंत नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे आणि महाड येथे सभा घेतल्या आहेत. राज्यातील शेवटच्या टप्प्याचं मतदान 29 एप्रिल रोजी होत आहे. त्यापूर्वी आणखी तीन ते चार सभा राज ठाकरे घेण्याची शक्यता आहे.
 

Web Title: permission for mumbai rally of mns chief raj thackeray for Lok Sabha Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.