पुजारी टोळीतील फरार गुुंड गजाआड
By admin | Published: March 18, 2016 02:53 AM2016-03-18T02:53:08+5:302016-03-18T02:53:08+5:30
कुख्यात गॅँगस्टर रवी पुजारी टोळीतील फरारी असलेल्या एका सराईत गुंडाला मुंबई पोलिसांनी ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातून अटक केली.
मुंबई : कुख्यात गॅँगस्टर रवी पुजारी टोळीतील फरारी असलेल्या एका सराईत गुंडाला मुंबई पोलिसांनी ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातून अटक केली.
छत्रपाल उर्फ अविनाश कैलास प्रसाद (वय ३३) असे त्याचे नाव असून, गेल्या सुमारे तीन वर्षांपासून तो फरार होता. त्याच्यावर खून व फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
घाटकोपर स्टेशन रोडजवळील मेट्रो पुलाखाली ७ मार्च २०१३ रोजी जबरी चोरी, दरोडाविरोधी पथकाने पुजारी टोळीतील तिघांना अटक करून त्यांच्याकडील २ पिस्तुले व १० काडतुसे जप्त केली. त्यांना ही शस्त्रे छत्रपालकडून मिळाल्याचे तपासातून स्पष्ट झाले होते. तथापि, गेली
तीन वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता.
गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-१च्या पथकाचे प्रभारी निरीक्षक अशोक खोत यांना छत्रपाल हा ठाण्यातील साठे नगरातील वागळे इस्टेट परिसरात काही दिवसांपासून वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी व सहायक निरीक्षक विजय ढमाळ, नागेश पुराणिक, गुलझारीलाल फडतरे आदींच्या पथकाने सापळा रचून बुुधवारी अटक केली. (प्रतिनिधी)